NCP Politics : राष्ट्रवादीच्या आमदारांना धडाधड फोन, पार्थ पवारांनी घेतली बैठक, मोठं काय तरी घडणार?

NCP MLA Sunetra Pawar Parth Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयाकडून आमदारांना फोन करण्यात आल्याची चर्चा आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाविषयी त्यांचे मत जाणून घेण्यात आले.
Sunetra Pawar Parth Pawar.jpg
Sunetra Pawar Parth Pawar.jpgSarkarnama
Published on: 
Updated on: 

NCP News : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना जोरदार उधाण आले आहे. त्यातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयाकडून पक्षातील सर्व आमदारांना फोन केल्याची माहिती आहे. विलीनीकरणाबाबत भूमिका काय? शरद पवारांच्या पक्षाकडून फोन आला होता? अशी विचारणा त्यांना करण्यात येत असल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिली आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडी समोर येत असतानाच खासदार पार्थ पवार यांनी राष्ट्रवादीच्या सात आमदारांना आपल्या पुण्यातील जिजाई निवास्थानी तातडीने बोलावले आहे. बैठकीला मुळशीचे आमदार शंकर मांडेकर, मंत्री दत्तात्रय भरणे, शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके उपस्थित असल्याचे वृत्त टीव्ही 9 या वृत्तवाहिनीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

दोन्ही राष्ट्रवादीचे नेते दिल्लीत

दोन्ही राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आज राजधानी दिल्लीत आहेत.यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे.संसदीय बैठकीसाठी नेते दिल्लीत गेल्याची माहिती आहे. या नेत्यांच्या अचानक झालेल्या दिल्ली वाऱ्यांमुळे आणि भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात विलीनीकरणांच्या चर्चांना उधाण आले आहे.

Sunetra Pawar Parth Pawar.jpg
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे 20 आमदार फुटणार? सुनील तटकरेंनी एका वाक्यात विषय संपवला; म्हणाले, 'आमचा पक्ष …'

सुप्रिया सुळेंनी चर्चा फेटाळल्या

खासदार सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. त्या म्हणाल्या की, विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव त्यांच्यासमोर नाही. माझा भाऊ गेला, त्याच दिवशी माझ्यासाठी विलीनीकरणाचा विषय संपला, असे देखील त्या म्हणाल्या.

Sunetra Pawar Parth Pawar.jpg
NCP Merger : विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान बीडमध्ये बजरंगबाप्पा-आमदार पंडित एकत्र : राजकीय वर्तुळात चर्चा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.