Harshvardhan Patil : मुख्यमंत्री फडणवीसांच्या स्वागताला पवारांच्या बड्या नेत्याची हजेरी; 'ही' अपेक्षाही व्यक्त केली!

Devendra Fadnavis Indapur Tour : पंढरपूरनंतर देवेंद्र फडणवीस हे हेलिकॉप्टरने इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथे दाखल झाले. फडणवीस येण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी दाखल झाले होते.
Devendra Fadnavis-Harshvardhan Patil
Devendra Fadnavis-Harshvardhan PatilSarkarnama
Published on
Updated on

Pune, 29 March : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (ता. 29 मार्च) पंढरपूरहून इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथील कुलदैवत लक्ष्मी-नृसिंहाचे दर्शनासाठी आले होते. फडणवीस यांचे स्वागत करण्यासाठी माजी सहकार मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे फडणवीस येण्यापूर्वीच त्यांच्या स्वागतासाठी पाटील हे नीरा नरसिंहपूरला येऊन थांबले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज एका दिवसात तुळजापूर, पंढरपूर आणि नीरा नसिंहपूर असा दौरा केला. सकाळी मुंबईहून विशेष विमानाने फडणवीस सोलापुरात दाखल झाले. सोलापुरातून हेलिकॉप्टरने ते सकाळी तुळजापूरला गेले, त्यांनी त्या ठिकाणी तुळजा भवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर फडणवीसांनी तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची पाहणी केली. त्याचवेळी फडणवीसांनी विकास आरावड्याला मान्यता देत असल्याचेही जाहीर केले.

तुळजापूरनंतर फडणवीसांनी पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात सुरू असलेल्या कामाची पाहणी करून पंढरपूर कॉरिडॉरचे काम येत्या तीन महिन्यांत सुरू होईल, अशी घोषणाही केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे सांत्वनही केले. पंढरपूरनंतर फडणवीस हे हेलिकॉप्टरने इंदापूर (Indapur) तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथे दाखल झाले.

देवेंद्र फडणवीस येण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil ) हे मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी दाखल झाले होते. विधानसभा निवडणुकीत इंदापूर मतदारसंघ अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार हे निश्चित झाल्यानंतर पाटील यांनी भाजपला जय श्रीराम करत तुतारी हाती घेतली होती.

Devendra Fadnavis-Harshvardhan Patil
Pandharpur Corridor : पंढरपुरातून देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; काॅरिडाॅरचे काम पुढील तीन महिन्यांत सुरू होणार

पक्षांतर करूनही हर्षवर्धन पाटील यांना कोणताही फायदा झाला नाही. कारण विधानसभा निवडणुकीत कॅबिनेट मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडून पुन्हा पराभव झाला. पराभवानंतरही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाटील यांच्या खांद्यावर पक्षाची पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. मात्र, मागील काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली होती. मात्र, राष्ट्रवादीच्या बैठकांना नियमित हजेरीही लावत आहेत, त्या पार्श्वभूमीवर आजच्या फडणवीस-हर्षवर्धन पाटील भेटीबाबत उत्सुकता होती.

माजी हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत दौंडचे आमदार राहुल कुल, भाजप नेते वासुदेव काळे, विधानसभेची निवडणूक लढविलेले सोनाई परिवाराचे प्रवीण माने आणि इतर नेतेमंडळीही उपस्थित होते.

Devendra Fadnavis-Harshvardhan Patil
Devendra Fadnavis Solapur Tour : फडणवीसांनी नाकारला आपल्या प्रिय आमदाराचा पुष्पगुच्छ; कारणही आले पुढे! (Video)

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लक्ष्मी नृसिंहाच्या दर्शनासाठी येत आहेत. योगायोगाने आम्हीही याच परिसरात होतो, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी आम्ही आलो आहोत. महायुती सरकारला राज्यातील जनतेने मोठे बहुमत दिले आहे. पण सरकार शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळत नाही, त्यांनी ते पाळले पाहिजे, अशी अपेक्षाही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com