Amol Pawar
Amol PawarSarkarnama

Pune News : पवारांचा मोठा निर्णय; ‘कार्यक्रमाला येईल, पण भाषण करणार नाही’

No speech Wedding Ceremonies : पवार यांच्या या निर्णयामुळे चमको नेतेमंडळींची चांगली पंचाईत झाली आहे.
Published on

Khed News : व्यासपीठ मिळताच नेतेमंडळी भाषण ठोकायला तयार असतात... मग तो लग्नाचा कार्यक्रम असो अथवा दशक्रिया विधीचा कार्यक्रम... नेतेमंडळींची भाषणबाजी ठरलेलीच असते. मात्र, उपस्थितांसाठी ही भाषणबाजी सर्वांत कंटाळवाणी ठरते. इच्छा नसूनही पुढाऱ्यांची ती रटाळं भाषण उपस्थितांना ऐकावीच लागतात. मात्र, खेडचे माजी उपसभापती तथा शिवसेना नेते अमोल पवार यांनी ‘लग्न, साखरपुडा, दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात आपण भाषण करणार नाही, असे पत्रक काढून जाहीर केले आहे. त्यामुळे पवारांनी इतर नेतेमंडळींची चांगलीच पंचाईत केली आहे. (No speech at Dashakriya rituals and wedding ceremonies : Amol Pawar)

तुळशीच्या लग्नानंतर आता सर्वत्र लग्नसराईची धामधूम सुरू होते. लग्नात अथवा दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात नेतेमंडळींचे भाषण हे सर्वांत रटाळवाणे असते. जनसंपर्काचे माध्यम म्हणून बहुतांश नेतेमंडळी साखरपुडा, लग्न, वाढदिवस यासारख्या आनंदाच्या, मयत, दशक्रिया विधी यांसारख्या कार्यक्रमाला उपस्थिती लावतात. परंतु अनेक वेळा सुख-दुःखाचे प्रसंग बाजूला राहतात आणि नेतेमंडळीच्या भाषणबाजीमुळे अशा कार्यक्रमांना राजकीय स्वरूप येते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amol Pawar
Jarange Patil On Fadnavis : फडणवीसांचा एकदाच फोन आला अन्‌ एकच वाक्य बोलले... मनोज जरांगेंनी सांगितली 'ती' गोष्ट

नेतेमंडळींना अशी आयती व्यासपीठं मिळाल्यानंतर कार्यमालकाच्या सुख-दुःखात सामील व्हायचे सोडून ही नेतेमंडळी एकमेकांची उणीदुणी काढताना दिसतात. काहीजण राजकीय निवृत्ती जवळ आली तरी एकमेकांना टोमणे मारण्याची संधी सोडत नाही. स्पष्टवक्ते कोणाचीही भीडभाड न ठेवता भाषणबाजी करणाऱ्याला सुनावतात. पण काही नेतेमंडळी हसतात आणि वेळ मारून भाषणबाजी चालूच ठेवतात. त्यातूनच आळंदी परिसरातील काही गावांनी दशक्रिया विधीला नेत्यांच्या भाषणबाजीला कायमस्वरुपी विरोध दर्शविला आहे.

अनेक राजकीय पुढारी असे असतात की, त्यांना संबंधित कुटुंबाबाबत काहीही माहिती नसते. केवळ अगोदरचा वक्ता बोलला, म्हणून त्याचा आधार घेत संबंधित कुटुंबाबत मोघम बोलत असतात. पण उपस्थितांना सत्य परिस्थिती माहिती असते, त्यामुळे समोरच्याचा फोलपणा उघड होत असतो.

Amol Pawar
Solapur News : सगळंच बारामतीला नेण्याची प्रथा सुरू केली काय? अन्न उत्कृष्टता केंद्रावरून सुभाष देशमुख आक्रमक

सर्वसामान्यांमध्ये याबाबत असलेली नाराजी हेरून शिवसेनेचे नेते तथा माजी उपसभापती अमोल पवार यांनी आपण या पुढील काळात कोणत्याही लग्नकार्यात भाषण करणार नाही. तसेच जावई पोशाख आणि मामा मंडळींचे पोशाख द्यायला उठणार नाही. दशक्रिया विधीतसुद्धा श्रद्धांजलीचे भाषण करणार नाही. देणग्या द्यायला उठणार नाही, असे एक पत्रक काढून जाहीर केले आहे. त्यांच्या या निर्णयाचे तालुक्यातीलच नव्हे; तर अन्य तालुक्यांतील तरुणाईने स्वागत केले आहे. त्यांचे हे पत्रक तरुणांच्या व्हॉट्स ॲप स्टेटसला झळकत होते.

पवार यांच्या या निर्णयामुळे चमको नेतेमंडळींची चांगली पंचाईत झाली आहे. आजवर अनेकजण ही पद्धत बंद झाली पाहिजे, असे म्हणायचे. पण पुढाकार कोणी घेत नव्हते. पवारांचा हा धाडसी निर्णय तालुक्यातील अन्य नेतेमंडळींच्या पचनी पडेल का? असा सवाल उपस्थित होत आहे.

Amol Pawar
Pandharpur Wari : फडणवीसांची कार्तिकी महापूजा यशस्वी करणारे पडद्यामागचे पाच शिलेदार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com