Omraje Nimbalkar : ओमराजे दिल्लीहून पुण्यात रिटर्न; विमानतळावर 'हायव्होल्टेज ड्रामा'; शेवटी दुसऱ्या गेटने एक्झिट

Omraje Nimbalkar Delhi Visit : मध्यरात्री दिल्लीला गेलेले ओमराजे निंबाळकर आज सकाळी साडेअकरा वाजता दिल्लीतून पुण्याच्या फ्लाईटने परतले. दुपारी साडेबाराच्या सुमारास ते पुणे विमानतळावर दाखल झाले. मात्र, विमानतळावर उतरल्यानंतर खरा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.
Omraje Nimbalkar
Omraje Nimbalkar Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 17 Jun : राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार फोडल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण चांगलंच तापवलं आहे. त्यातच ठाकरे गटाचे सर्वात विश्वासू समजले जाणारे धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या 'गुप्त' दिल्ली दौऱ्याने आणि पुणे विमानतळावरील हायव्होल्टेज ड्राम्याने या चर्चांना आणखी बळ दिलं आहे.

आज सकाळी खासदार संजय राऊतांनी आपल्या पक्षांच्या खासदारांना थेट विमानातून उचलून नेल्याचा खळबळजनक दावा केला आहे. राऊत यांनी एका चार्टर्ड विमानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत, नांदेड विमानतळावरून याच विमानातून खासदार संजय जाधव यांना नेण्यात आल्याचा आरोप केला. राऊतांच्या या दाव्यानंतर 'ऑपरेशन टायगर' खरंच अंतिम टप्यात असल्याचे संकेत मिळत आहेत.

तर दुसरीकडे, उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू शिलेदार समजले जाणारे खासदार ओम राजेनिंबाळकर हे गेल्या आठवड्यापासून वैद्यकीय कारणास्तव पुण्यात ठाण मांडून होते. मात्र मंगळवारी रात्री १ वाजता पुण्यातून एका खाजगी विमानाने ते तडकाफडकी दिल्लीसाठी रवाना झाले. हा संपूर्ण प्लॅन इतका गोपनीय ठेवण्यात आला होता की, ओमराजेंच्या दिल्ली दौऱ्याची साधी भणकही कोणाला लागू दिली नाही.

Omraje Nimbalkar
Sanjay Raut : पवन राजेनिंबाळकरांच्या हत्येचा निकाल फिरवण्यासाठी ओमराजे 'मॅनेज' झाले; क्रॉनोलॉजी सांगत ठाकरेंच्या शिवसेनेचा गंभीर आरोप

विशेष म्हणजे, मंगळवारी दिवसभरात या विमानांच्या उड्डाणाच्या वेळेत अनेकदा बदल करण्यात आले. अखेर रात्री १ वाजता विमानाने उड्डाण केले. मिळालेल्या माहितीनुसार, ओम राजेनिंबाळकर आणि इतर नेत्यांना दिल्लीला नेण्यासाठी पुणे विमानतळावर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाने २ खाजगी विमानांची व्यवस्था करण्यात आली होती.

दिल्लीहून पुण्यात रिटर्न

मध्यरात्री दिल्लीला गेलेले ओमराजे निंबाळकर आज सकाळी साडेअकरा वाजता दिल्लीतून पुण्याच्या फ्लाईटने परतले. दुपारी साडेबाराच्या सुमारास ते पुणे विमानतळावर दाखल झाले. मात्र, विमानतळावर उतरल्यानंतर खरा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. दिल्लीहून परतल्यानंतर ओमराजे निंबाळकर तब्बल तीन तास पुणे विमानतळाच्या व्हीआयपी लाउंजमध्येच बसून होते.

Omraje Nimbalkar
Sanjay Raut MP Revolt : चार वेळा साईबाबांची शपथ घेतली अन्…; दिल्लीतून संजय राऊतांचा सूचक इशारा, भाऊसाहेब वाकचौरेंवर संशय?

विमानतळाबाहेर मीडिया कॅमेऱ्यांसह सज्ज असताना, ओमराजेंनी माध्यमांना स्पष्टपणे टाळले. माध्यमांच्या प्रश्नांना तोंड द्यायला लागू नये म्हणून त्यांनी केले मुख्य गेटने बाहेर न पडता, ओमराजे निंबाळकर विमानतळाच्या दुसऱ्या दाराने बाहेर पडले आणि एका खाजगी गाडीत बसून रवाना झाले.

ओमराजे निंबाळकर यांच्या या संशयास्पद दिल्ली वारीमुळे आणि विमानतळावरील 'लपाछपी'मुळे चर्चांना उधाण आलं आहे. जर हा 'ऑपरेशन टायगर'चा भाग असेल, तर आता या संपूर्ण प्रकरणावर स्वतः ओमराजे निंबाळकर काय अधिकृत स्पष्टीकरण देतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com