Dhananjay Munde On Sambhaji Bhide : भिडेंच्या प्रश्नावर धनंजय मुंडे यांनी हात जोडत बोलण्याचे टाळले!

Sambhaji Bhide Controversial Statement : भिडेंना त्वरित अटक करण्याची मागणी केली जात आहे.
Dhananjay Munde On Sambhaji Bhide :
Dhananjay Munde On Sambhaji Bhide :Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pimpri News : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी महात्मा गांधींबाबत (Mahatma Gandhi) केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात राज्यभरात विरोधी पक्षाचे नेते रस्त्यावर उतरले आहेत. विविध ठिकाणी आंदोलने होत आहेत. त्यात भिडेंना त्वरित अटक करण्याची मागणी केली जात आहे. त्यासंदर्भात राज्याचे कृषीमंत्री धनजंय मुंडे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी या विषयावर बोलण्याचे टाळत, हातच जोडले.

Dhananjay Munde On Sambhaji Bhide :
Guardian Ministers News : धनंजय मुंडेंकडे मोठी जबाबदारी; बीडचे पालकमंत्रीपद, तर लातूर बनसोडेंकडे

पंकजा मुंडेंना मोठी जबाबदारी :

वर्षाअखेर देशातील काही राज्यांमध्ये होणारी विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर २०२४ ची लोकसभा निवडणूक ध्यानात घेऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आपली नवी टीम शनिवारी (ता.२९) जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातील पक्षाच्या फायरब्रँड नेत्या पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सचिवपदी कायम ठेवण्यात आले आहे. त्यावर त्यांचे चुलतबंधू धनजंय मुंडे यांनी मध्यप्रदेशची जबाबदारी पंकजांना त्यांच्या पक्षाने दिली हे फार चांगलं झालं, अशी सकारात्मक प्रतिक्रिया दिली.

Dhananjay Munde On Sambhaji Bhide :
Pankaja Munde Childhood Photos : पंकजा मुंडेंच्या बालपणीच्या काही आठवणी आणि त्यांच्या नावाची गमतीशीर गोष्ट !

महाराष्ट्राच्या राजकारणातून मागील विधानसभेला भाजपमधून बाहेर फेकले गेलेले विनोद तावडे यांच्यावरही पुन्हा मोठा विश्वास नड्डांच्या निवडणूक टीममध्ये दाखविला गेला आहे.पक्षाने जबाबदारी दिलेल्या राज्यात त्यांनी यश मिळवून दाखवल्याने त्यांना पुन्हा पक्षाने महामंत्री पदावर कायम ठेवले आहे. तर, पंकजा यांना सचिव म्हणून दुसऱ्यांदा संधी दिली आहे.तसेच त्यांच्याकडे मध्यप्रदेशची जबाबदारी दिली गेली आहे.

Dhananjay Munde On Sambhaji Bhide :
Sharad Pawar Visit PM Modi : शरद पवार हे मोदींसाठी पुण्यात थांबणार की केजरीवालांची विंनती मानणार ?

यावर मुंबईत बोलताना मंत्री धनंजय मुंडे यांनी हे फार चांगलं झालं, असे समाधान व्यक्त केले. त्यातून या दोघा बहिण भावातील कटूता गेल्या काही दिवसांपासून कमी झाल्याला आणखी दुजोरा मिळाला आहे. दोन महिने रजा घेणार असल्याचे वक्तव्य नुकतेच पंकजांनी नुकतेच केल्यानंतर राज्यात वेगळीच चर्चा रंगली. ती थेट त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशापर्यंत गेली होती. त्यानंतर पुन्हा भाजपने त्यांच्यावर ही राष्ट्रीय जबाबदारी पुन्हा सोपवून मोठा विश्वास टाकला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com