एक वर्षाच्या चिमुरडीनं केली ओमिक्रॉनवर मात!

एक वर्षाच्या मुलीने ओमिक्रॉनवर मात केली असून, तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
Omicron
OmicronSarkarnama

मुंबई : राजस्थान, गुजरात, कर्नाटक, दिल्लीमध्ये ओमिक्रॉनचे (Omicron Variant) रुग्ण सापडण्यास सुरुवात झाल्यानंतर राज्यातही ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. असे असले तरी पिंपरी-चिंचवडमधील एक वर्षाच्या मुलीने ओमिक्रॉनवर मात केली आहे. तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. याचवेळी ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला तीन वर्षांच्या मुलाला कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाही.

नायजेरियातून पिंपरी-चिचवडमध्ये आलेले तीन जण सुरवातीला ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळले होते. नंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या चौघांना संसर्ग झाला होता. त्यातच एका तीन वर्षांच्या मुलाचा समावेश होता. या मुलाला कोणतीही लक्षणे दिसून आली नव्हती. त्याची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Omicron
अमित शहा खोटारडे..! संतप्त नागरिक मोठ्या संख्येने उतरले रस्त्यावर

गेल्या पंधरवड्यात परदेशातून व त्यातही ओमिक्रॉनचा प्रसार झालेल्या आफ्रिका आणि युरोपमधून शहरात आलेले परदेशी प्रवासी व त्यांच्या संपर्कातील अशा एकूण ३४० जणांची पिंपरी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने आतापर्यंत तपासणी केली. त्यात ११ परदेशी प्रवाशांसह त्यांच्या संपर्कात आलेले २१ अशा ३२ जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात नायजेरियाहून आलेले तिघांचे कुटुंब आणि त्यांच्या संपर्कातील चार अशा सात जणांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते.

Omicron
म्हाडाच्या परीक्षेआधी दलालांना कळकळीचं आवाहन करीत आव्हाड म्हणाले...

कल्याण डोंबिवलीमध्ये राज्यातील ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर धारावीचा परिसरही ओमिक्रॉनच्या छायेत आला आहे. टांझानिया येथून आलेला एक प्रवासी ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळला आहे. टांझानियामधून हा प्रवासी 4 डिसेंबरला परतला होता. या प्रवाशाला 7 हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा स्वॅब जिनोम सिक्वेसिंग चाचणीकरता कस्तुरबा गांधी रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवला होता. अखेर या चाचणीचा अहवाल मिळाला आहे. हा रुग्ण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळला आहे. या रुग्णाला कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नव्हती. त्याने कोरोना लशीचा एकही डोस घेतलेला नव्हता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com