PMC News : अजितदादांच्या निधनाच्या दु:खाचे सावट, पुणे महापालिकेकडून सांस्कृतिक कार्यक्रम; खासदार मोहोळ संतापले

PMC Cultural Event Controversy: अजित पवारांच्या निधनानंतर दु:खाचे सावट असताना पुणे महापालिकेडून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 15 फेब्रुवारीला हा कार्यक्रम होणार होता.
Murlidhar Mohol slams PMC for organizing cultural events after Ajit Pawar's death
Murlidhar Mohol slams PMC for organizing cultural events after Ajit Pawar's deathSarkarnama
Published on
Updated on

Murlidhar Mohol's reaction to PMC cultural programs: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत 28 जानेवारीला निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रावर दु:खाचे सावट आहे. अजिदादांच्या निधनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार देखील केला नाही.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील सभा, रॅली रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, पुणे महापालिकेच्या वर्धापन दिना निमित्त अजब निर्णय घेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 15 फेब्रुवारील करण्यात आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात नाच गाणे होणार होते.

अधिकाऱ्यांच्या या निर्णायवर संताप व्यक्त केला जात आहे. खासदार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील या निर्णयाविषयी समजल्यानंतर त्यांनी संताप व्यक्त करत हा कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना केल्या. मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेने 15 फेब्रुवारीचा कार्यक्रम रद्द केला आहे.

दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर शोककाळात असा कार्यक्रमाचे आयोजन करणे कितीपत योग्य आहे, असा सवात उपस्थित केला जात आहे. अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन करताना किमान परिस्थितीचे भान ठेवायला हवे होते, अशी देखील चर्चा आहे.

Murlidhar Mohol slams PMC for organizing cultural events after Ajit Pawar's death
Government Land Scam: तब्बल एक हजार कोटींचा जमीन घोटाळा, शासकीय अधिकारी गोत्यात;  हेमंत पाटील, धर्मेश शहांवर गुन्हा दाखल

महापौर निवडीनंतर आनंदोत्सव नाही

पुणे महापौर निवडणूक 9 फेब्रुवारीला होणार आहे. भाजपचा महापौर होणे ही केवळ औपचारिकता राहिली आहे. मात्र, महापौर निवडीनंतर कोणताही आनंदोत्सव साजरा केला जाणार नाही, असा निर्णय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे.

अपघाताच्या प्राथमिक अहवालात काय?

साम टिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार विमानाचा अपघात केवळ तांत्रिक बिघाडामुळे झाले नाही. सुत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, प्राथामिक अहवालात म्हटले आहे की, अपघात केवळ तांत्रिक बिघाडामुळे नाही तर विमानाच्या लँडिंगचा अँगलच चुकला असल्याचे म्हटले आहे.

Murlidhar Mohol slams PMC for organizing cultural events after Ajit Pawar's death
AAP Leader Shot Dead : पंजाब हादरलं! गुरुद्वाराबाहेरच आम आदमी पक्षाच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com