PMC News : धक्कादायक! पुणे महापालिकेत महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन, माजी उपमहापौरांनी हात पकडून...

PMC Woman Employee : पुराव्यांशी छेडछाड होऊ नये यासाठी माजी महापौरांना पुढील आदेशापर्यंत महापालिकेच्या आवारात प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे.
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : पुणे महापालिकेत काम करणाऱ्या एका महिलेसोबत माजी उपमहापौरांनी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महापालिकेच्या विशाखा समितीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाने माजी उपमहापौरांना महापालिकेच्या आवारात प्रवेशबंदी केली आहे.

गुरुवारी (ता. ५) दुपारी महापालिकेत स्थायी समितीची बैठक होती. त्यामुळे बहुतांश कर्मचारी, अधिकारी हे बैठकीच्या ठिकाणी होते, तसेच दुपारी जेवणाची सुट्टी झाल्याने उर्वरित कर्मचारी हे बाहेर होते. त्यावेळी तक्रारदार महिला काम करत असताना माजी उपमहापौराने थेट महिला कर्मचाऱ्याचा हात पकडून गैरवर्तन, केले, तसेच असभ्य भाषेत तिच्याशी संवाद साधला.

या महिलेने माजी उपमहापौरांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत घडलेला प्रसंग वरिष्ठांच्या कानावर घातला. दरम्यान, या प्रकारामुळे महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला असून, अशा माननीयांना धडा शिकवला जावा, अशी मागणी केली जात आहे.

विशाखा समितीच्या अध्यक्षा, विधी सल्लागार अ‍ॅड. नीशा चव्हाण म्हणाल्या, "संबंधित महिलेची तक्रार प्राप्त झाली असून, यावर योग्य ती कारवाई कैली जाईल.

Pune Municipal Corporation
PMC: पुणेकरांनो, अवघ्या अडीच मिनिटांत पर्वतीवर! सारसबाग-पर्वती रोप-वेबाबत महापालिकेचा मोठा निर्णय

माजी महापौरांना पालिकेत येण्यास बंदी

महापालिकेचे सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी सांगितले की, हा प्रकार घडल्यानंतर संबंधित तक्रारदार महिलेवर कोणताही दबाव येऊ नये आणि पुराव्यांशी छेडछाड होऊ नये यासाठी संबंधित व्यक्तीला पुढील आदेशापर्यंत महापालिकेच्या आवारात प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे.

Pune Municipal Corporation
BJP Politics : महापालिकेत 'गोकुळ'ची पुनरावृत्ती; स्वीकृत नगरसेवकांचा आनंद ठरला क्षणभंगुर!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.