पुणे शहरात गेल्या महिन्यात पीएमपीएमएम ठेकेदारांनी अचानक संप पुकारला होता. यामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ झाली होती. पण आता पीएमपीएमएम प्रशासनाने ठेकेदारांना मोठा दणका दिला आहे. संप करणाऱ्या ठेकेदारांना दंड ठोठावण्यात येणार आहे. (PMPML to impose penalty on striking contractors)
भाड्याची रक्कम थकल्याने गेल्या महिन्यात पीएमपीएलच्या ठेकेदारांनी संप पुकारात सेवेत असलेल्या इ बसेस अचानक बंद केल्या. यामुळे पीएमपीएल लाही मोठा आर्थिक फटका बसला. यामुळे पीएमपीएलच प्रशासनाने शहरातील सहा ठेकेदारांना २ कोटी ३१ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. पीएमपीएल प्रशासनांकडून कारवाई करण्यात येणार आहे.
त्याच संपामुळे पीएमपीएमएला आर्थिक फटका बसला. आता ठेकेदारांच्या बिलातून ही दंडाची रक्कम वसूल केली जाणार आहे. सहा ठेकेदारांवर पीएमपीएल प्रशासन करणार कारवाई जाणार आहे.
काय आहे प्रकरण?
गेल्या महिन्यात पीएमपीएमएल बस गाड्या पुरवणाऱ्या ठेकेदारांनी अचानक संप पुकारला. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती. या संपाचा सुमारे विद्यार्थी, नोकरदार यांच्यासह सात ते आठ लाख प्रवाशांना फटका बसला. ठेकेदारांनी ‘पीएमपीएमएल’च्या ओलेक्ट्रा, ट्रॅव्हल टाइम, अँथनी व हंसा या चार ठेकेदारांचे चार महिन्यांचे ९९ कोटी रुपयांची बिले थकल्याने त्यांनी अचानक संप सुरु केला. संपात ९०७ बसेसची सेवा अचानक ठप्प झाल्याने मोठ्या प्रमाणात ‘पीएमपीएमएल’ची सेवा विस्कळीत झाली होती.
त्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने पीएमपीएमएल प्रशासनाला ९० कोटी रुपये दिले. त्यापैकी ६६ कोटींची थकीत रक्कम या चार ठेकेदारांना आणि २४ कोटी रुपये हे 'एमएनजीएल'चे देण्यात आले. त्यानंतर दिड दिवसांच्या या संपानंतर ठेकेदारांनी संप मागे घेतला आणि बससेवा पुन्हा सुरुळीत सुरु झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.