

Pune, 13 July : सासवड-जेजुरी मार्गावर ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याची भावना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी व्यक्त केली. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पालखी मार्गावरील सुविधा, रस्त्यांची स्थिती आणि वाहतुकीच्या नियोजनावरही नाराजी व्यक्त केली. वारीतील नियोजनाची जबाबदारी सोलापूर जिल्हा परिषदेने घेतली आहे, मात्र त्यांच्याकडून पुण्यावर जबाबदारी ढकलली जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे जिल्हा परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी वारीच्या नियोजनातील त्रुटीबाबत भाष्य केले. जेजुरी येथील अपघाताची माहिती मिळताच पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची यंत्रणा तातडीने कार्यरत करण्यात आली. जखमी वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे जगदाळे यांनी सांगितले.
ते म्हणाले, पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवे घाटातील अरुंद रस्ता आणि सुरू असलेल्या कामांमुळे पालखी सोहळ्याचा वेग मंदावला आहे, त्यामुळे माऊलींची पालखी सासवड येथे नियोजित वेळेपेक्षा उशिराने पोहोचली. परिणामी मुक्कामाच्या ठिकाणी तंबू उभारण्यासही विलंब झाला.
पालखी तळावरील जर्मन हँगर उभारणीसाठी आवश्यक भराव टाकण्याची जबाबदारी ऐनवेळी पुणे जिल्हा परिषदेवर टाकली गेली. सोलापूर जिल्हा परिषदेने नियोजन करण्याची जबाबदारी घेतली आहे, मात्र त्यांच्याकडून पुण्यावर जबाबदारी ढकलली जात आहे, असा आरोपही जगदाळे यांनी केला.
पुणे जिल्हा परिषदेला वारीमध्ये सेवा पुरविण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आम्ही केवळ आदेशांचे पालन करणारी यंत्रणा बनलो आहोत. मात्र, या सर्व परिस्थितीतही पुणे जिल्हा परिषद वारकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यास कटिबद्ध आहे, असे पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.