Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर शहराध्यक्ष घाटेंचं मोठं विधान, म्हणाले...

Pune BJP President Dheeraj Ghate : '...तर आम्ही धंगेकरांचे स्वागत करू' असंही भाजपचे पुणे शहाराध्यक्ष धीरज घाटे यांनी म्हटलं आहे.
Dheeraj Ghate and Ravindra Dhangekar
Dheeraj Ghate and Ravindra DhangekarSarkarnama
Published on
Updated on

Pune Loksabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोर्चेबांधणी सुरू आहे. आपला संभाव्य उमेदवार कोण असेल याची चाचणी वरिष्ठ पातळीवर करण्यात येत आहे. काँग्रेसकडून पुणे लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी विद्यमान आमदार रवींद्र धंगेकरांचं नाव प्रकर्षाने समोर येत आहे.

अशातच भाजपाचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे यांनी धंगेकर भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागत असेल असं सूचक विधान करत, पुन्हा एकदा धंगेकरांना अप्रत्यक्षपणे भाजपकडून ऑफरच दिली आहे. तर या ऑफरबाबत आणि राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर आता भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया समोर आली आहे.

मागील काही दिवसांपासून स्थानिक भाजप नेते विरुद्ध आमदार धंगेकर हा संघर्ष टोकाला पोहोचल्याचे दिसत आहे. भाजप नेत्यांकडून धंगेकर यांना पालिका अधिकाऱ्याला शिव्या देतानाचा व्हिडिओ व्हायरल करून घेरण्याचे प्रयत्न केले जात आहे. तर दुसरीकडे माजी खासदार संजय काकडे यांनी धंगेकर यांना भाजपची ऑफर दिली आहे.

'रवींद्र धंगेकरांनी(Ravindra Dhangekar) भाजपमध्ये प्रवेश करायचा का नाही? हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे . मात्र भाजपमध्ये त्यांनी येण्याची इच्छा व्यक्त केल्यास आम्ही स्वागत करू. मात्र रवींद्र धंगेकर सध्या काँग्रेसमय झाले असून ते येतील असं वाटत नाही. तरीही ते आल्यास त्यांचे नक्कीच स्वागत केलं जाईलं.' असं संजय काकडे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dheeraj Ghate and Ravindra Dhangekar
Lalit Patil Drugs Case : आमदार धंगेकरांचा मुश्रीफांवर गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

दरम्यान मागील पुणे महापालिका निवडणुकीच्या काळात संजय काकडे(Sanjay Kakde) हे धंगेकर यांना भाजपमध्ये घेण्यास आग्रही होते. त्यांनी त्या प्रकारची तयारी देखील केली होती आणि वरिष्ठ नेत्यांना देखील धंगेकर यांना भाजपमध्ये घेणं किती योग्य आहे, हे पटवून दिलं होतं. मात्र धंगेकर यांच्या भाजप प्रवेशापूर्वी पुण्यातील काही स्थानिक नेत्यांनी धंगेकरांच्या प्रवेशाला विरोध केला होता.

त्यामुळे ऐनवेळी धंगेकरांना काँग्रेसचा एबी फॉर्म देखील मिळू शकला नव्हता. परिणामी काँग्रेस पुरस्कृत म्हणून निवडणूक लढवून ते नगरसेवक झाले. मात्र हा विजय साकार करताना त्यांनी भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याचा आणि त्यांच्या पक्षप्रवेशांमध्ये आडकाठी घालणाऱ्या नेत्याचा मोठा पराभव केला होता. त्यामुळे धंगेकरांना या निवडणुकीत जायंट किलर म्हणून पाहायला गेलं होतं.

आता धंगेकर यांना काँग्रेसकडून लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं जात असताना, त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत उलटसुलट चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे शहाराध्यक्ष धीरज घाटे(Dheeraj Ghate) यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे.

Dheeraj Ghate and Ravindra Dhangekar
Pune BJP News : भाजप शहराध्यक्षांनी बोलून दाखवली खंत; म्हणाले,'आम्हाला काहीच अधिकार नाही...'

'रवींद्र धंगेकर यांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा की नाही हा सर्वस्वी निर्णय प्रदेश पातळीवरती घेतला जाईल. तो निर्णय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा असेल स्थानिक नेत्यांनी केलेल्या वक्तव्याला तितकं असं महत्त्व नाही. प्रदेश पातळीवरती रवींद्र धंगेकर यांना भाजपमध्ये घेण्याचा निर्णय झाल्यास आम्ही त्यांचे स्वागत करू.' असं धीरज घाटे यांनी स्पष्ट केलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com