

Pune News : सध्या भारत आणि बांगलादेश या दोन देशातील संबंध मोठ्या प्रमाणात ताणले गेले असल्याचे पाहायला मिळत आहेत. भारतामध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप मध्ये सहभागी होण्यासाठी बांगलादेश ने आपल्या क्रिकेटरला जाण्यापासून रोखले आहे. एकीकडे या घडामोडी सुरू असताना दुसरीकडे मात्र पुणे शहरात अवैधपणे बांगलादेशींचे वेगळेच रॅकेट सुरू असल्याचं समोर आले आहे.
पुण्यात बांगलादेशी नागरिकांचा अवैध वास्तव्य असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधित बिल्डिंगमध्ये धाड टाकत काही बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे.
पुणे पोलिसांनी 27 जानेवारीला बुधवार पेठ परिसरामध्ये ही मोठी कारवाई केली आहे. एक संशयित इमारतीत बांगलादेशी लोक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हि माहिती मिळताच पोलिसांनी लगेच टीम तयार करत धाड टाकली. या दरम्यान डिस्को नावाच्या इमारतीला चारही बाजूंनी पोलिसांनी घेराव घातला आणि इमारतीची कसून झाडाझडती घेतल्यानंतर या तपासणीमध्ये 9 बांगलादेशी महिला आणि 1 बांगलादेशी पुरुष पकडले गेले.
हे बांगलादेशी बुधवार पेठ परिसरात वेश्या व्यवसाय करत होते असं समोर आलं आहे. तसेच त्यांच्या तपासात आधार आणि इतर कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आले आहे. ते सर्व बेकायदेशीररीत्या भारतात आले होते.सध्या त्यांना रिमांड होममध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची चौकशी करून त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या देशामध्ये पाठवण्याची प्रक्रिया पोलिसांनी (pune Police) सुरू केली आहे.
याबाबत माहिती देताना उपायुक्त ऋषीकेश रावले म्हणाले, आम्हाला गुप्त माहिती मिळाली त्यानुसार बुधवार पेठे मधील डिस्को बिल्डिंगमध्ये काही संशयित बांगलादेशी असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार टीम करून त्या बिल्डिंग चा शोध घेतला असता तब्बल दहा बांगलादेशी नागरिक त्या ठिकाणी आढळून आले आहेत.
हे सर्व बांगलादेशी नागरिक वेश्याव्यवसाय सक्रिय असल्याचं समोर आला आहे. त्याच्याकडे बनावट कागदपत्र देखील आढळून आले असून त्यांना ती कागदपत्र कोणी दिली याचा देखील आम्ही शोध घेत आहोत तसंच या सर्वांना परत बांगलादेशमध्ये पाठवण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.