Pune News: पुण्यातील कॉलेजमध्ये धक्कादायक घटना; 19 वर्षीय तरुणी तब्बल 14 तास लिफ्टमध्ये अडकली, नेमकं काय घडलं..?

19 year Student Remained Trapped In A Lift: पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयातून धक्कादायक घटना समोर येत आहे. वाघोलीत राहणारी 19 वर्षीय विद्यार्थिनी कॉलेजच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यादरम्यान लिफ्टमध्ये अडकली.
19 Years Girl STuck In College Lift (AI Genarated Images)
19 Years Girl STuck In College Lift (AI Genarated Images)Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News: पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयातून धक्कादायक घटना समोर येत आहे. वाघोलीत राहणारी 19 वर्षीय विद्यार्थिनी कॉलेजच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यादरम्यान लिफ्टमध्ये अडकली. एक ना दोन ही विद्यार्थिनी लिफ्टमध्ये तब्बल 14 तास अडकून पडल्याची हादरवणारी घटना उघडकीस आली आहे.

पुण्यातील एका कॉलेजमध्ये 19 वर्षीय तरुणीसोबत भयानक प्रकार घडला.ही तरुणी बुधवारी (ता.18 नोव्हेंबर) दुपारी सुमारे 3.30 वाजता क्लास संपल्यानंतर नेहमीप्रमाणे घरी जाण्यासाठी बाहेर पडली. तिने खाली उतरण्यासाठी लिफ्टमध्ये प्रवेश केला. पण सलग वीजपुरवठा खंडित झाल्यानं लिफ्ट बंद पडली. यामुळे लिफ्टमध्ये ती तरुणी अडकली. तिने त्यावेळी मदतीसाठी आरडाओरडा केला, पण कोणालाही ती लिफ्टमध्ये अडकल्याचं लक्षातही आलं नाही.

ही महाविद्यालयीन तरुणी लिफ्टमधून बाहेर पडण्यासाठी प्रचंड धडपड करत होती.पण तिच्या मदतीला कोणीही सरसावले नाही. मदत मागूनही आवाज पोहोचला नाही. लिफ्टमध्ये रेंजचा प्रोब्लेम असल्यानं कोणाला फोनही करू शकली नाही. त्याचदरम्यान,संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास तिचा फोनही बंद झाला. त्यामुळे ही तरुणी तब्बल 14 तास त्या लिफ्टमध्ये होती.

तर दुसरीकडे वाघोलीत राहणार्‍या या 19 वर्षीय तरुणीचं कुटुंबही मुलगी घरी न आल्यामुळे प्रचंड चिंतेत आलं. कॉलेजला गेलेली मुलगी घरी परतली नाही. तसेच तिचा फोनही बंद येत होता. त्यामुळे काळजीत पडलेल्या पालकांनी तिचा शोधाशोध सुरू केला. अखेर पालकांनी पोलिसांकडे धाव घेत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

19 Years Girl STuck In College Lift (AI Genarated Images)
Beed Kapildhar Trust: कार्तिक पौर्णिमा यात्रेच्या तोंडावरच बीडच्या कपिलधार देवस्थानमध्ये वादाचा भडका: धर्मादाय विभागाचा मोठा निर्णय

यानंतर गुरूवारी पहाटे कॉलेजमध्ये वीजपुरवठा पूर्ववत झाला आणि लिफ्ट पुन्हा एकदा सुरु झाली. एका महिलेनं लिफ्टचं बटण दाबलं. लिफ्टचा दरवाजा उघडताच महिलेनं त्या तरुणीला पाहिलं आणि तिची बंद पडलेल्या लिफ्टमधून अखेर सुटका झाली.

मुलीनं आई-वडिलांना संपर्क करून झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर गुरुवारी पहाटे 14 तासानंतर लेकीसोबत घडलेल्या घटनेचं वास्तव समजल्यावर पालकांना मोठा धक्काच बसला. तरुणीची अस्वस्था पाहून पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली.

19 Years Girl STuck In College Lift (AI Genarated Images)
Teacher Scam : बोगस शिक्षक भरती प्रकरणात शिक्षण विभागाची मोठी कारवाई, 73 शिक्षकांची सेवा समाप्त; बीडमध्ये शैक्षणिक वर्तुळात खळबळ

या घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्यासह राज्यातील महाविद्यालयांच्या सुरक्षा व्यवस्था, लिफ्टची देखभाल आणि आपत्कालीन यंत्रणांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. महाविद्यालय प्रशासनाने प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.