Pune DCC bank Election : पुणे जिल्हा बँकेत माऊली दाभाडेंना आव्हान देणार कोण? मावळच्या साम्राज्यात विरोधकांची निवडणुकीआधीच शांतता

Maval constituency News : बँकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी मावळ तालुक्यातील विकास सोसायट्या व इतर सभासद संस्थांनी आपल्या संस्थेच्या वतीने बँकेच्या निवडणुकीत मतदान करणारा प्रतिनिधी ठरविण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
PDCC Bank Election | Pune Cooperative Politics
PDCC Bank Election | Pune Cooperative PoliticsSarkarnama
Published on: 
Updated on: 

ज्ञानेश्वर वाघमारे

Pune News : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सन १९९०-९१ पासून एका पंचवार्षिकचा अपवाद वगळता तब्बल २५ वर्षे मावळ तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे सहकारमहर्षी ज्ञानेश्वर तथा माऊली दाभाडे सहाव्यांदा ‘अ’ वर्ग मतदारसंघातून बँकेत जाण्याच्या तयारीत आहेत. बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी मतदान करणाऱ्या प्रतिनिधींचे नुकतेच झालेले ठराव व विरोधी गोटात दिसत असलेली शांतता लक्षात घेता त्यांच्या विरोधात कोणी प्रतिस्पर्धी असेल का, याबाबत मोठी उत्सुकता आहे.

जिल्हा बँक संचालक मंडळाच्या २०२६-२७ ते २०३१-३२ या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. बँकेच्या निवडणुकीत मतदान करणारा प्रतिनिधी ठरविण्यासाठी सदस्य संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव मागविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता मतदार यादी व निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे इच्छुकांच्या हालचाली वाढल्या आहेत. बँकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी मावळ तालुक्यातील विकास सोसायट्या व इतर सभासद संस्थांनी आपल्या संस्थेच्या वतीने बँकेच्या निवडणुकीत मतदान करणारा प्रतिनिधी ठरविण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. तालुक्यातील एकूण १९१ संस्थांपैकी १२८ संस्थांचे ठराव गेले आहेत.

तालुक्यात अ वर्गातील (विविध कार्यकारी विकास सोसायट्या) ५६ सोसायट्या असून, त्यातील वडगाव वगळता उर्वरित ५५ सोसायट्यांचे ठराव गेले आहेत. ब वर्गातील (पणन संस्था- खरेदी विक्री संघ व कांदा उत्पादक संस्था) दोन संस्था असून दोन्ही संस्थांचे ठराव गेले आहेत. क वर्गातील (सहकारी पतसंस्था) एकूण ४४ संस्थांपैकी ३७ संस्थांचे ठराव गेले आहेत. ड वर्गातील (इतर संस्था- हाउसिंग, मजूर) ७४ संस्थांपैकी ३२ संस्थांचे ठराव गेले आहेत.

PDCC Bank Election | Pune Cooperative Politics
Someshwar Election : ‘तो’ व्हिडिओ जगतापांना भोवणार? जय पवारांनी कारवाईची घोषणाच केली; सोमेश्वरमध्ये नवा ट्विस्ट

वैयक्तिकमधील १४ पैकी एका संस्थेचा ठराव गेला आहे. तालुक्यातील अ वर्ग मतदारसंघासाठी सद्यःस्थितीत विविध कार्यकारी सोसायट्यांचे ५५ मतदार आहेत. विद्यमान संचालक माऊली दाभाडे पुन्हा या जागेवर निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. नगरपरिषद व जिल्हा परिषद निवडणुकीत मिळविलेल्या घवघवीत यशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा हुरूप वाढला आहे. भाजपसह इतर पक्षांमध्ये सध्या दिसत असलेले शांततेचे वातावरण व नुकत्याच झालेल्या ठरावांचे संख्याबळ लक्षात घेता दाभाडे यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी निवडणुकीच्या रिंगणात राहणार का याबाबत मोठी उत्सुकता आहे.

PDCC Bank Election | Pune Cooperative Politics
Someshwar election : 'सोमेश्वर'च्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बिनविरोधसाठी पडद्यामागे सूत्रं हलली...

माऊली दाभाडे यांचा जिल्हा बँकेच्या राजकारणात दीर्घकाळ प्रभाव राहिला आहे. त्यांनी सन २०१५चा अपवाद वगळता पाच पंचवार्षिक निवडणुकांमध्ये तालुक्यातील अ वर्ग मतदारसंघातून विजय मिळवला. सन २०१५ मध्ये माऊली दाभाडे व बाळासाहेब नेवाळे यांच्यात या जागेसाठी अटीतटीची लढत झाली. त्यात नेवाळे यांनी दोन मतांनी सनसनाटी विजय प्राप्त केला. त्यानंतर २०२१मधील निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या. त्या निवडणुकीत दाभाडे यांची बिनविरोध निवड झाली.

‘पीडीसीसी’ची रणधुमाळी

‘ड’ वर्गासाठी दळवी इच्छुक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे व ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे यांच्या मते ५५ पैकी ४५हून अधिक मतदार हे राष्ट्रवादी पक्षाला मानणारे आहेत. त्यामुळे दाभाडे यांचा एकतर्फी विजय होईल. दुसरीकडे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सांगितले की, जिल्हा पातळीवर पक्षाचे पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचे प्रयत्न सुरू असून वरिष्ठांच्या आदेशानुसार अंतिम निर्णय होईल. जिल्ह्यात महायुतीचे पॅनेल झाल्यास भाजपचे माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी ड वर्ग मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

PDCC Bank Election | Pune Cooperative Politics
Uttam Jankar : पवारांच्या आमदारांची वीज अधिकाऱ्यांना दमदाटी; बंगल्यावर बोलावून हातात हंडे देत कपडे काढण्यास सुनावले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com