Dattatray Bharane : अजितदादांविना पुणे DPDC ची पहिलीच बैठक; नव्या पालकमंत्री सुनेत्रा पवारांनी कोणते निर्णय घेतले? दत्तामामांनी सगळं सांगितलं

Sunetra Pawar : अजित पवार यांच्या निधनानंतर पहिली पुणे डीपीडीसी बैठक पार पडली. सुनेत्रा पवार ऑनलाईन उपस्थित राहिल्या. निधी आराखडा मंजूर झाला असून शिस्त पाळत बैठकीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
Sunetra Pawar attends the Pune DPDC meeting via video conference as leaders observe discipline in memory of late Ajit Pawar.
Sunetra Pawar attends the Pune DPDC meeting via video conference as leaders observe discipline in memory of late Ajit Pawar.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : दिवंगत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर गुरुवारी (ता.12) जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक पार पडली. नव्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पालकमंत्री म्हणून बैठकीला उपस्थित राहिल्या.

जिल्हा परिषदेकडून या बैठकीसाठी जिल्ह्यातील सगळ्या आमदार आणि खासदार आणि जिल्हा नियोजन समिती सदस्यांना निमंत्रण देण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक आमदार या बैठकीला उपस्थित होते. तसेच सुनेत्रा पवार या प्रत्यक्ष उपस्थित न राहता मुंबई येथून वीडियो कॉन्फरन्स द्वारे बैठकीला हजर होत्या.

या बैठकीनंतर मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांना माहिती दिली भरणे म्हणाले, आज अजित दादांविना डीपीडीसीची बैठक पार पडली. यासारखं मोठं दुःख नाही. एक काम करणारा आणि शिस्तप्रिय नेता आपल्यात नाही यावर अजून देखिल विश्वास बसत नाही.

मात्र या बैठकीमध्ये मागील वर्षाचा खर्च आणि पुढील वर्षाच्या खर्चाचा आराखडा याबाबत चर्चा झाली आणि त्याला मंजुरी देण्यात आली आहे. पुढील वर्षी जास्तीत जास्त निधी पुणे जिल्ह्याला मिळावा यासाठी आम्ही पालकमंत्र्यांकडे मागणी केली आहे. ही मागणी राज्याचे मुख्यमंत्री यांनी अर्थमंत्री पूर्ण करतील असा विश्वास भरणे यांनी व्यक्त केला.

Sunetra Pawar attends the Pune DPDC meeting via video conference as leaders observe discipline in memory of late Ajit Pawar.
Budhwar Peth Pune :बुधवार पेठेत 12 वाजता नाकाबंदी 683 पोलीस अन हाताला लागले 700 जण.. ऑपरेशन बाबत पोलीस अधिकाऱ्यांनी दिली धक्कादायक माहिती

भरणे पुढे म्हणाले, आज बैठक सुरू करताना आम्ही सर्वांनी एक गोष्ट पाळली ती म्हणजे आपल्या सर्वांना दादा हे शिस्तप्रिय होते हे माहिती आहे. त्यामुळे अगदी दहाच्या ठोक्यावर आम्ही बैठक सुरू केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील 9 वाजून 55 मिनिटांनी ऑनलाईन बैठकीसाठी उपस्थित राहिल्या होत्या. दादांना श्रद्धांजली वाहायची असेल तर त्यांनी जी आयुष्यभर वेळ पाळली ती आपण देखील पाळणं आवश्यक आहे. असं मंत्री भरणे यावेळी म्हणाले.

Sunetra Pawar attends the Pune DPDC meeting via video conference as leaders observe discipline in memory of late Ajit Pawar.
Pune Police : धक्कादायक! मदत मागण्यासाठी आलेल्या तरुणीचा पोलिस चौकीतच सौदा; देहविक्री व्यवसायात ढकलले! महिला पोलिस कर्मचारी निलंबीत

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत बोलताना भरणे म्हणाले, बुधवारी (ता.11) वाहिनी दिल्लीत होत्या, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना त्या भेटल्या आहेत. त्यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. त्यामुळे वाहिनी आल्या की विलनीकरणाबाबत त्याच बोलतील आणि वरिष्ठ निर्णय घेतील आणि जे आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असेल. त्यामुळे आम्ही कुणीतरी वेगळं बोलण्यापेक्षा वहिनी प्रमुख आहेत त्याच योग्य तो निर्णय घेतील असं दत्तात्रय भरणे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com