Ganesh Visarjan: 10000 हजार पोलीस, 3500 CCTV अन् AI...; गणेश विसर्जन मिरवणुका 'निर्विघ्नं'पणे पार पडण्यासाठी पुणे पोलिसांचा तगडा प्लॅन

Pune Ganpati Visarjan: पुणे पोलिसांनी शहरातील गणेश विसर्जन सोहळा वेळेत आणि निर्विघ्नंपणे पार पडण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. विसर्जन सोहळ्यापूर्वी बुधवारी(ता.22)पोलिसांनी मोठा रुट मार्च काढत आपली तयारी दाखवून दिली आहे.
Pune Police And Ganesh Visarjan .jpg
Pune Police And Ganesh Visarjan .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुण्यातील गणपती विसर्जन सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. सार्वजनिक तसेच घरगुती गणपती बाप्पांना शुक्रवारी अनंत चतुदर्शीच्या दिवशी अगदी भावपूर्णरित्या निरोप दिला जातो. जसा पुण्यातील गणेशोत्सवात गणपतीसमोरील देखाव्यांचं विलक्षण आकर्षण असतं, त्याचप्रमाणे विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठीही दरवर्षी मोठी गर्दी होत असते. त्याच पार्श्वभूमीवर शहरात कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित होऊ नये यासाठी पुणे पोलिस अलर्ट मोडवर आले आहेत.

पुणे पोलिसांनी शहरातील गणेश विसर्जन सोहळा वेळेत आणि निर्विघ्नंपणे पार पडण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. विसर्जन सोहळ्यापूर्वी बुधवारी(ता.22)पोलिसांनी मोठा रुट मार्च काढत आपली तयारी दाखवून दिली आहे. मात्र, विशेष म्हणजे पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक सोहळ्यासाठी तब्बल 10 हजार पोलिस अधिकारी, कर्मचारी विसर्जन मार्गासह शहरांतील रस्त्यांवर तैनात असणार आहे.

यंदाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये कोणतीही अनुचित घटना, प्रकार घडू नये याची दक्षता म्हणून पुणे पोलीस प्रशासनाने तगडा प्लॅन आखला आहे. यात तब्बल 10 हजार पोलिस अधिकारी, कर्मचारी 3500 सीसीटीव्ही कॅमेरे, AI टेक्नोलॉजीचा वापर करुन विसर्जन सोहळ्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींवर अत्यंत बारकाईनं २४ तास लक्ष ठेवून असणार आहे.

शहरातील प्रमुख गणेश मंडळे, विसर्जन मिरवणुकीचे मुख्य मार्ग, महत्त्वाचे चौक आणि गर्दीच्या सर्व ठिकाणांवर या हायटेक कॅमेऱ्यांच्या साहाय्यानं वॉच ठेवला जात आहे. या विसर्जन सोहळ्यात काही संशयास्पद किंवा संवेदनशील बाब निदर्शनास आल्यास 'कमांड अँड कंट्रोल सेंटर'मधून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना देत आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत.

Pune Police And Ganesh Visarjan .jpg
Rahul Gandhi Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांनी माफीचा साक्षीदार व्हावे, PM मोदी-शहांची चौकशी..! राहुल गांधींच्या विधानाने राजकारणात खळबळ

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता या चार प्रमुख मार्गांवरुन एकूण 638 गणपती मंडळ आपल्या विसर्जन मिरवणुका काढणार आहेत. तर 150 मंडळं हे कुमठेकर तसेच केळकर रस्त्यांवरुन मिरवणूक काढण्याची परवानगी दिली आहे. शहरात विसर्जन सोहळ्यासाठी तब्बल 26 ठिकाणी वाहन पार्किंगची सोय करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीची इत्यंभूत माहिती ही diversion. Punepolice. Gov. in या खास वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. तसेच या वेबसाईटवर शहरातील वाहतूक बदल मानासह प्रमुख गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीचा मार्ग, तसेच लाईव्ह अपडेट समजण्यास मदत होणार आहे. ही मिरवणूक शांततेत व सुरक्षितपणे पार पडण्यासाठीचं नियोजन पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि जॉईंट सीपी (सहपोलीस आयुक्त) संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. 

Pune Police And Ganesh Visarjan .jpg
Rahul Gandhi PC: भाजप का जिंकतंय...; इंदिरा गांधींचा दाखला अन् राहुल यांनी थेट मोदी-शहांसह आयोगालाही अडचणीत आणलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com