MLC Election : दौंडच्या १७ नगरसेवकांनी फिरवला पुण्याच्या आमदारकीचा गेम; संख्याबळात राष्ट्रवादीपेक्षा मागे असलेल्या भाजपला बुस्टर डोस

Daund councillors support BJP in MLC election: पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत दौंड नगरपालिकेतील १७ नगरसेवकांमुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यांनी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चुरशीची लढत रंगण्याची शक्यता आहे.
The entry of 17 Daund municipal councillors has changed the political dynamics in the Pune Local Authorities MLC election.
The entry of 17 Daund municipal councillors has changed the political dynamics in the Pune Local Authorities MLC election.Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra MLC election political updates: विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची १ जूनपर्यंत मुदत असून, १८ जूनला मतदान होणार आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींचे संख्याबळ सर्वाधिक असून, दुसऱ्या क्रमांकावर भाजप आहे. यात दौंड नगरपालिकेतील १७ नगरसेवकांनी या निवडणुकीचे संपूर्ण चित्रच पालटले आहे.

जिल्ह्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीमधील नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती यांची एकूण संख्या सुमारे ८०४ इतकी आहे. त्यात सर्वाधिक ३४७ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यानंतर भाजपचे ३१९, शिवसेनेचे ६८ सदस्य आहेत. काँग्रेसचे १९, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे १७ सदस्य आहेत.

संख्याबळात प्रथमदर्शनी राष्ट्रवादी काँग्रेस पुढे दिसून येत आहे. शिवाय गत दोन टर्म या जागेवर राष्ट्रवादीचे अनिल भोसले आमदार होते. त्यामुळे राष्ट्रवादीचा या जागेवर नैसर्गिक दावा आहे. पण दौंड नगरपालिकेतील प्रेमसुख कटारिया यांच्या नागरी हित संरक्षण मंडळाच्या १७ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्यानंतर भाजपचे संख्याबळ ३३६ पर्यंत येऊन पोहोचले आहे. संख्याबळाच्या गणितात मागे असलेला भाजप आता राष्ट्रवादीच्या जवळ येऊन पोहोचला आहे.

The entry of 17 Daund municipal councillors has changed the political dynamics in the Pune Local Authorities MLC election.
MLC Election: विधानपरिषदेचा धुरळा : यवतमाळ 'स्थानिक'साठी भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच : माजी मंत्री की नवीन चेहरा उतरणार मैदानात?

राष्ट्रवादीपेक्षा भाजपचे संख्याबळ आता केवळ अकराने कमी आहे. पण पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत वाढलेले वर्चस्व पाहता भाजप ही जागा खेचून आणण्यासाठी उत्सुक आहे. जर दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला आणि मैत्रीपूर्ण लढत झाली, तर पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर 'घोडेबाजार' होण्याची दाट शक्यता आहे. या संघर्षात शिवसेनेचे ६८ सदस्य कोणाला मतदान करणार? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करणार का? असे प्रश्न आहेत.

The entry of 17 Daund municipal councillors has changed the political dynamics in the Pune Local Authorities MLC election.
Pune MLC election : विधानपरिषदेचा धुरळा : पुण्यात 'स्थानिकच्या' गणितात भाजप, राष्ट्रवादीतच चुरस : महायुतीमध्येच जोरदार रस्सीखेच

दोन्ही पक्षांकडून ६ माजी आमदार इच्छुक :

राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निवडणूक लढण्यासाठी दिलीप मोहिते, सुनील टिंगरे, रमेश थोरात, विलास लांडे हे माजी आमदार इच्छुक आहेत. याशिवाय अजित गव्हाणे, रणजित शिवतारे, दीपक मानकर यांचीही नावे चर्चेत आहेत.

कदाचित सुनेत्रा पवार यांच्याकडून धक्कातंत्राचा वापर करून चर्चेत नसलेले नावही समोर येऊ शकते, तर भाजपमध्ये संग्राम थोपटे, संजय जगताप, गणेश बिडकर, यांच्याकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com