MLC Election : काकडेंच्या उमेदवारीनंतर राष्ट्रवादीत पहिला राजीनामा; अजितदादांना धोका देणाऱ्याच्या मुलाला उमेदवारी दिल्याचा आरोप...

NCP Candidate Vikram Kakade Controvercy : पुण्याची विधानपरिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटेल असं जवळपास निश्चित मानला जात होतं. त्यामुळे अनेक माजी आमदारांनी या जागेवरती आपली वर्णी लावावी यासाठी फिल्डिंग लावली होती. तसेच अनेक वरिष्ठ नेते देखील या उमेदवारीसाठी इच्छुक होते.
Pune MLC Election | NCP Candidate Vikram Kakade Row
Pune MLC Election | NCP Candidate Vikram Kakade RowSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 01 Jun : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार (1 जून) शेवटचा दिवस आहे. यात बहुचर्चेत असलेली पुण्याची जागा अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली असून या ठिकाणी विक्रम काकडे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटेल असं जवळपास निश्चित मानला जात होतं. त्यामुळे 4 माजी आमदारांनी या जागेवरती आपली वर्णी लावावी यासाठी फिल्डिंग लावली होती. तसेच अनेक वरिष्ठ नेते देखील या उमेदवारीसाठी इच्छुक होते.

यामध्ये दिलीप मोहिते, सुनील टिंगरे, रमेश थोरात, विलास लांडे हे माजी आमदार इच्छुक होते. याशिवाय अजित गव्हाणे, रणजित शिवतारे, दीपक मानकर यांचीही नावे चर्चेत होती. मात्र, राष्ट्रवादीकडून एक सप्राईज नाव पुढे आलं यामुळे राष्ट्रवादी अंतर्गत मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचं बोललं जात आहे.

आता ही अंतर्गत खदखद बाहेर आली आहे. काकडे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पुण्यातून पहिला राजीनामा पक्षाला सोपवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पर्वती विधानसभा मतदारसंघातील कार्याध्यक्ष असलेले रामदास गाडे यांनी आपला राजीनामा पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार आणि पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांना पाठवला आहे.

Pune MLC Election | NCP Candidate Vikram Kakade Row
NCP Politics: राष्ट्रवादीला घरचा आहेर! स्वीकृत, जिल्हा परिषद अन् दूध संघ निवडीवरून पक्ष नेतृत्वालाच आव्हान

या राजीनाम्यात म्हटले आहे की, 'आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या चुकीच्या उमेदवाराची घोषणा आज झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी आम्ही आमचे घरदार दावणीला लावले तीस वर्ष पक्षाशी एकनिष्ठ आहे कर्जबाजारी झालोय आणि 2017 ला ज्या संजय काकडेंनी पक्ष फोडला पक्षाचे दोन दोन टर्मचे नगरसेवक फोडून भारतीय जनता पार्टीत नेले. त्यांना रसद पुरवली.

Pune MLC Election | NCP Candidate Vikram Kakade Row
Nanded MLC : नांदेडमध्ये सबकुछ अशोक चव्हाणच! भाजपकडून राजूरकरांना उमेदवारी, राष्ट्रवादी-शिवसेनेनेही टाकल्या नांग्या

अजितदादांच्या पाठीत खंजीर खुपसला व देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवर जाऊन बसले अशा संजय काकडेंच्या मुलाला जर पक्ष तिकीट देत असेल तर आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षात काय किंमत राहणार आहे? त्यामुळे मी माझ्या सर्व पदांचा राजीनामा आपल्याकडे सुपूर्द करत आहे तो आपण नम्रपणे स्वीकारावाही आपणास नम्र विनंती," अशा भावना या राजीनामा पत्रात व्यक्त करण्यात आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com