Pune Mlc Election : शिक्षकचा भाव फुटला! मताला 10 हजार, राजू शेट्टी म्हणाले, 'श्याम' सारखे...

Raju Shetti Pune Teachers Constituency : पुणे पदवीधर तसेच पुणे शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान पार पडत आहे. सकाळी 10 पर्यंत 12.94 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, मताचा भाव ठरल्याची देखील चर्चा आहे.
Raju Shetti Pune Teachers Constituency
Raju Shetti Pune Teachers Constituency sarkarnama
Published on: 
Updated on: 

Raju Shetti News : आज विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक पार पडत आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षकसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत आहे. अपक्षांमुळे या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. दरम्यान, शिक्षकसाठी 10 हजार रुपयांचा भाव फुटलाची चर्चा होती. त्यावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी ट्विट केले आहे.

ते म्हणाले, 'शिवाजी महाराजांनी सुरत लुटली ती स्वराज्याच्या कामासाठी स्वत:साठी नव्हे. पुणे पदवीधर मतदारसंघातील शिक्षकांना मताला १० हजार प्रमाणे वाटप चालू केले आहे असे ऐकले.'

'शिक्षकांना विनंती आहे मतदान करताना फक्त “श्यामची आई “ आठवा आणि “ श्याम” सारखे वागा.', असे आवाहन देखील त्यांनी केले.

आज सकाळी आठपासून मतदानाला सुरुवात झाली. दरम्यान सकाळी 10 पर्यंत पुणे पदवीधरमध्ये 8.86 टक्के मतदान झाले आहे. तर, पुणे शिक्षक मतदारसंघात 12.94 टक्के मतदान झाले आहे. पुणे शिक्षकसाठी सकाळी 10 पर्यंत आठ हजार मतदारांना मतदानाचा हक्का बजावला होता.

Raju Shetti Pune Teachers Constituency
MLC Election : पदवीधर, शिक्षकसाठी मतदानाला जाताय, 'ही' ओळखपत्र जवळ ठेवा!

..तर मतं बाद ठरणार

पदवीधर निवडणुकीत मतपत्रिकेवर मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्याने दिलेले जांभळ्या रंगाचेच स्केच पेन वापरा करावा अन्य पेन किंवा पेन्सिल वापरल्यास मत बाद होईल. तसेच तुमच्या आवडत्या एकाच उमेदवाराच्या नावासमोर १ हा आकडा लिहा. पहिली पसंती न नोंदवल्यास मतपत्रिका अवैध ठरते. १' हा आकडा एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर लिहू नका. एकाच उमेदवाराला पहिली पसंती देणे आवश्यक आहे. इतर उमेदवारांना पसंतीनुसार २, ३, ४ असे आकडे देऊ शकता. इतर पसंतीक्रम देणे पूर्णपणे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे.

Raju Shetti Pune Teachers Constituency
MLC election News: मतदानाच्या एक दिवस आधीच गेम फिरला : दोन कट्टर विरोधकांची हातमिळवणी; एका भेटीने समीकरण बदलले !

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com