MSEDCL Pune : महावितरणच्या कार्यालयात दारू पार्टीचा धिंगाणा! व्हिडीओ व्हायरल होताच तिघांवर कारवाई

MSEDCL Pune Viral Drinking Video : महावितरण कार्यालयातील व्हिडीओ समोर आल्यानंतर महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली. सहाय्यक अभियंता रोहन शिंगाडे आणि वायरमन संदीप काळे व रमेश मगर या तिघांना निलंबित करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
MSEDCL Pune | Power Staff Suspended | Drinking Video
MSEDCL Pune | Power Staff Suspended | Drinking VideoSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News, 25 Oct : नागरिकांना अखंडित वीजपुरवठा देण्याची जबाबदारी असलेल्या महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी चक्क कार्यालयातच मद्यपान केल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. लोहगाव येथील संत नगर वीज उपकेंद्रातील या प्रकाराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर महावितरणच्या वर्तुळात खळबळ उडाली. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेत सहाय्यक अभियंत्यासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

गुरुवारी रात्री आठच्या सुमारास एका स्थानिक नागरिकाने संत नगर वीज उपकेंद्राला भेट दिली. त्या वेळी सहाय्यक अभियंता रोहन शिंगाडे आणि अन्य कर्मचारी मद्यपान करत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. या प्रकाराचे नागरिकाने मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये संबंधित अधिकारी-कर्मचारी मद्यपान करत असल्याचे दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच, सहाय्यक अभियंत्याला व्यवस्थित चालताही येत नसल्याचे व्हिडीओत दिसत असल्याचे सांगितले जात आहे.

वीजपुरवठ्याची जबाबदारी असताना कार्यालयातच पार्टी!

शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर ग्राहकांना तक्रारींसाठी महावितरणच्या कार्यालयात धाव घ्यावी लागते. तांत्रिक बिघाडामुळे वीज गेल्यास नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

MSEDCL Pune | Power Staff Suspended | Drinking Video
Kumbh Mela Controversy : "गिरीश महाजन कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न, त्यांचे नातेवाईक बोगस ऑर्डर..."; ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप

अशा परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी असलेले अधिकारी-कर्मचारीच कार्यालयात मद्यपान करत असल्याचा प्रकार समोर आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सरकारी कार्यालयात नागरिकांच्या समस्या सोडविण्याऐवजी अशा प्रकारांना थारा मिळत असेल, तर जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नियंत्रण कोणाचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

MSEDCL Pune | Power Staff Suspended | Drinking Video
Maharashtra viral Audio Clip : जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपचे नाशिक कनेक्शन? विरोधात बैठक घेणारे नेते कोण?

व्हिडीओ समोर येताच वरिष्ठांची कारवाई

या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली. सहाय्यक अभियंता रोहन शिंगाडे आणि वायरमन संदीप काळे व रमेश मगर या तिघांना निलंबित करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. कार्यालयात मद्यपान केल्याच्या आरोपामुळे महावितरणच्या कर्मचारीवर्गाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com