PMC News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; तर अभय योजनेतून ९५५ कोटींची वसुली

Pune civic body tax waiver announcement: महापालिकेच्या मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेतून प्रशासनाने ९५४ कोटी ७८ लाख रुपयांची वसुली केली आहे.
PMC property tax waiver 800 crore news
PMC property tax waiver 800 crore newssarkarnama
Published on
Updated on

Pune tax defaulters relief scheme: महापालिकेच्या मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेतून प्रशासनाने ९५४ कोटी ७८ लाख रुपयांची वसुली केली आहे. पण या १ लाख ६४ हजार ६६५ थकबाकीदारांचा तब्बल ७९२ कोटी २१ लाख रुपयांचा दंड माफ करण्यात आला आहे.

PMC property tax waiver 800 crore news
Abhimanyu Pawar: संभाजी पाटील निलंगेकरांच्या खेळीनं अभिमन्यू पवारांचं गणित बिघडलं! झेडपी अध्यक्षपदाची औशाची संधी हुकली

पुणे महापालिकेच्या विकास कामांना, नवीन प्रकल्प, रस्ते करण्यासाठी भूसंपादनाची गरज आहे. पण त्यासाठी पुरेसा निधी शिल्लक नाही. निधी उभारणीसाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला. पण त्यास जास्त प्रतिसाद नव्हते. अनेकांनी पैसे न भरल्याने पुन्हा एका महिन्याची म्हणजे १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पहिल्याच सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी १५ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्याचा मागणी केली, त्यामुळे पुन्हा एकदा या योजनेचा कालावधी वाढविण्यात आला. स्थायी समितीमध्ये नगरसेवकांनी ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ द्यावी असा ठराव दिला होता. पण तो फेटाळण्यात आला आहे.

PMC property tax waiver 800 crore news
Ranjan Gogoi : अखेर माजी सरन्यायाधीश राज्यसभेतून निवृत्त : न्यायालयीन कामकाजात उंच शिखरावर गेलेले रंजन गोगोई संसदेत फेल

महापालिकेच्या हद्दीत एकूण ६ लाख ३७ हजार ६०९ मिळकतींवर तब्बल १३ हजार ९७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यात समाविष्ट गावांमधील सुमारे २ हजार कोटी, मोबाईल टॉवरवरील ४ हजार २५० कोटी आणि जुन्या हद्दीतील मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. या पार्श्वभूमीवर वसुली वाढविण्यासाठी अभय योजना लागू करण्यात आली होती. रविवारी (ता. १५) या योजनेची मुदत संपली. त्यामध्ये एकूण चार महिन्यांत १ लाख ६४ हजार ६६५ मिळकतधारकांनी या योजनेचा लाभ घेत ९५४ कोटी ७८ लाख रुपये महापालिकेकडे जमा केले. मात्र या सवलतीमुळे ७९२ कोटी २१ लाख रुपयांचा दंड माफ करण्यात आला आहे.

PMC property tax waiver 800 crore news
Rajya Sabha Result : भाजपचा घोडेबाजार यशस्वी! काँग्रेस, बिजू जनता दलाचे 11 आमदार फोडत तिसऱ्या उमेदवाराचा विजय

चार महिन्यात १ हजार ७० कोटी

या चार महिन्यांत अभय योजनेचे लाभार्थी नसलेले पण नियमीत कर भरणा करणाऱ्या १९ हजार ३२१ मिळकतधारकांनी ११५ कोटी ५७ लाख रुपये कर भरला. त्यामुळे एकूण १ लाख ८३ हजार ९८६ मिळकतधारकांकडून सुमारे १ हजार ७० कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे, अशी माहिती मिळकतकर विभागप्रमुख रवि पवार यांनी दिली.

PMC property tax waiver 800 crore news
Top 10 News: आव्हाडांनी दिलेल्या छत्रपती शिवरायांच्या संदर्भामुळं गदारोळ... ते बीडमध्ये घरातून उचलून नेत विवाहितेवर अत्याचार, रात्रभर चावडीला बांधून ठेवलं

शेवटच्या दिवशी २५ कोटींची वसुली

अभय योजनेच्या शेवटच्या दिवशी १५ मार्च रोजी २ हजार ५६० मिळकतधारकांनी २४ कोटी ३६ लाख रुपये कर भरला. तर १६८ मिळकतधारकांनी १ कोटी ५१ लाख रुपये कर भरला. त्यामुळे एका दिवसात एकूण २५ कोटी ८७ लाख रुपयांची वसुली झाली.

PMC property tax waiver 800 crore news
Jitendra Awhad : आव्हाडांनी दिलेल्या छत्रपती शिवरायांच्या संदर्भामुळं गदारोळ; विधानसभेत सत्ताधारी आमदारांचा राडा; नेमकं काय घडलं?

अभय योजनेचे लाभार्थी व भरलेली रक्कम

१५ मार्च रोजीचा भरणा

२,५०६० - २४.३६ कोटी रुपये

१५ नोव्हेंबर ते १५ मार्चचा भरणा

१.६४ लाख - ९५४.७८ कोटी

PMC property tax waiver 800 crore news
Benjamin Netyanahu: मृत्यूच्या चर्चांनंतर समोर आलेला नेत्यानाहूंचा कॉफी पितानाचा व्हिडिओ फेक? AI जनरेटेड असल्याच्या ग्रोकच्या दाव्यानं खळबळ

अभय योजनेचा लाभ न घेता करभरणा करणारे

१५ मार्च रोजीचा भरणा

१६८ - १.५१ कोटी रुपये

१५ नोव्हेंबर ते १५ मार्चचा भरणा

१९,३२१-९५४.७८ कोटी रुपये

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com