Punit Balan News : पुनीत बालन यांना दहीहंडीत मिरवणं भोवलं : पुणे पालिकेचा मोठा दणका

Pune Municipality News : तब्बल 3.20 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Punit Balan News
Punit Balan NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : दहीहंडीपासून गणेशोत्सवात जागोजागी बेकायदा फ्लेक्सबाजी करून उत्सवांत मिरवणाऱ्यांना महापालिकेने धडा शिकविण्याचा पवित्रा घेतला. महापालिकेच्या यंत्रणेला न जुमानता बेकादेशीरपणे फ्लेक्स उभारल्याचा ठपका ठेवून पुनीत बालन यांना महापालिकेने तब्बल 3.20 कोटी रुपयांचा दंड केला आहे. गंभीर म्हणजे, पुढच्या दोन दिवसांत दंडाची ही रक्कम भरण्याचा आदेश महापालिकेने बालन यांना दिला असून, ती न भरल्यास बालन यांना कायदेशीर कारवाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यापलीकडे जाऊन बालन यांच्या मिळकत करातूनही हा दंड वसूल करण्याची तयारी महापालिकेने ठेवली आहे. अशा प्रकारे फ्लेक्सबाजी करत बालन यांनी पुण्याचे विद्रूपीकरण तर केलेच; पण परवानगी न घेता उभारलेल्या फ्लेक्समुळे स्वत:चीही शोभा करून घेतल्याचे दिसत आहे.

गणेशोत्सवादरम्यान पूर्वी शहरात जाहिरात फलकांसाठी प्रतिमंडळ पाचशे रुपये याप्रमाणे पालिका शुल्क आकारत होती. यावर्षी हे शुल्क पालिकेच्या वतीने माफ करण्यात आले होते. ही सूट फक्त गणेशोत्सव काळासाठीच दिली जाते. दहीहंडी, नवरात्रोत्सवात नियमानुसार परवानगी घेऊनच जाहिरात फलक लावण्यास परवानगी दिली जाते. मात्र, पुनीत बालन यांनी दहीहंडी उत्सव काळात महापालिका सहायक आयुक्त कार्यालयांतर्गत येणार्‍या हद्दीत परवानगीशिवाय कंपनीच्या प्राॅडक्ट्सचे ८ बाय ४ या आकारांतील तब्बल २ हजार ५०० जाहिरात फलक लावून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण केल्याचे परवाना निरीक्षकांच्या निदर्शनास आले आहे.

Punit Balan News
Pankaja Munde News : 19 कोटी थोबाडावर मारू म्हणणारे पंकजाताईंचे समर्थक लागले कामाला; कारखान्यासाठी चेकवर चेक

महापालिका हद्दीमध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २४४ आणि २४५ नुसार अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र महानगरपालिका आकाशचिन्हे (स्काय साइन) व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन आहेत. नियंत्रण नियम, २०२२ च्या तरतुदीनुसार जाहिरात फलक उभारण्यासाठी महापालिकेची पूर्व परवानगी आवश्यक आहे. मात्र, या जाहिरातींसाठी कोणतीही पूर्व परवानगी घेण्यात आली नसल्याचे पालिकेने म्हटले आहे.

महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रूपीकरणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम, 1995 च्या तरतुदीनुसार, उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग झाला आहे. गणेशोत्सव वगळता इतर सर्व जाहिरातींसाठी शुल्क देणे बंधनकारक आहे. त्यानुसार 2 हजार 500 अनधिकृत जाहिरात फलकांचे एकूण 80 हजार चौरस फुटांचे 40 रुपये प्रतिदिन प्रतिचौरस फुटांप्रमाणे दहा दिवसांचे 3 कोटी 20 लाख रुपये वसूलपात्र दंडात्मक रक्कम होते.

त्यामुळे विनापरवाना जाहिरात केल्याप्रकरणी 3 कोटी 20 लाख रुपयांचा दंड नोटीस प्राप्त होताच दोन दिवसांच्या आत महापालिकेच्या कोशागारात त्वरित भरावा. मुदतीत दंडाची रक्कम न भरल्यास नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच वसूलपात्र रक्कम आपले मिळकतकरातून वसूल केली जाईल, असा इशारा परवाना व आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी पुनीत बालन यांना दिला आहे.

Punit Balan News
Pankaja Munde News : मुंडे समर्थकांनी शब्द खरा करून दाखवला...; दोन दिवसांतच कोट्यवधींचा निधी जमा !

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.