Sunetra Pawar : विलीनीकरण होईल तेव्हा होईल मात्र पुणे जिल्ह्यापुरता 'हा' निर्णय घ्या, पदाधिकाऱ्यांची सुनेत्रा पवारांना गळ

Pune NCP Merger Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीत पुणे जिल्ह्यातील नवनिर्वाचित सदस्यांशी बैठक घेतली. विलीनीकरणापूर्वी तरी पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र काम करावेत, अशी पदाधिकाऱ्यांची मागणी पुढे आली.
Deputy CM Sunetra Pawar interacts with newly elected Pune ZP and Panchayat Samiti members in Baramati amid NCP merger discussions.
Deputy CM Sunetra Pawar interacts with newly elected Pune ZP and Panchayat Samiti members in Baramati amid NCP merger discussions.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारली असून त्या आता कामाला लागल्या आहेत. गेले तीन दिवस त्यांच्याकडून बैठकांचे सत्र सुरू असून आज देखील बारामती मध्ये पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या नव्याने निवडून आलेल्या सदस्यांसोबत त्यांनी बैठक घेतली.

दौंड, पुरंदर, इंदापूर, हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद, समितीचे नवनिर्वाचित सदस्य या बैठकीला उपस्थित होते. यावेळी सदस्यांची ओळख आणि त्यानंतर अनौपचारिक चर्चा संपन्न झाली. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू असताना त्या संदर्भाने देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे. बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्याकडे काही पदाधिकाऱ्यांनी काही मागण्या देखील केल्या असल्याचं सांगितलं जात आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये इंदापूर पुरंदर तालुक्याची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांच्यासमोर जिल्ह्यातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित काम करावे असा प्रस्ताव ठेवला आहे. विलनीकरण होईल तेव्हा होईल मात्र पुणे जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित काम करतील आणि पुणे जिल्ह्यापुरता हा निर्णय तरी तुम्ही घ्यावा अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Deputy CM Sunetra Pawar interacts with newly elected Pune ZP and Panchayat Samiti members in Baramati amid NCP merger discussions.
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री, पक्षाध्यक्षानंतर सुनेत्रा पवारांवर आणखी एका मोठ्या संस्थेची जबाबदारी येणार

यावेळी सुनेत्रा पवार यांनी देखील पदाधिकाऱ्यांना शब्द दिला असून मी कुठल्याही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे सांगितले. तसेच निवडणुकीच्या वेळी अजित पवारांनी जो शब्द दिला होता की दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार हे आपले आहेत. तो पाळला जाईल.

Deputy CM Sunetra Pawar interacts with newly elected Pune ZP and Panchayat Samiti members in Baramati amid NCP merger discussions.
Sharad Pawar यांचे नेते Sunetra Pawar यांच्या भेटीला, काय शिजतंय?।Pune News

तुतारी चिन्हा चे उमेदवार जे घड्याळावर निवडून आलेले आहेत. त्यांच्यामध्ये कुठलाही संभ्रम नाही अशी माहिती यावेळी बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी उपस्थित केली. तेव्हा सुनेत्रा पवार यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी नेहमी उभा असेल असा शब्द दिला. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी विजय कोलते यांनी माहिती दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com