Pune News, 08 Oct : पुणे पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक निलेश भाऊसाहेब पाटील यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औंध परिसरातील त्यांच्या निवासस्थानी ही घटना घडली असून या घटनेमुळे पुणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
निलेश पाटील हे विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी 'सुवर्णयोग सोसायटी'मधील राहत्या घरात त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली. डोक्यात गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पाटील यांनी हे टोकाचं पाऊल नेमकं कोणत्या कारणातून उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या आत्महत्येमागे वैयक्तिक कारण होते की अन्य काही बाब, याबाबतही अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
तर गोळीबाराचा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आणि या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला.
पोलीस तपासातून आत्महत्येमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पुणे पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने अशा प्रकारे जीवन संपवल्याने पोलीस वर्तुळातही या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.