टीईटी परीक्षेत पास करण्यासाठी सव्वा चार कोटी लाटले.. त्याचे वाटप असे ठरले..

तुकाराम सुपे या हा घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार असल्याचे पुढे आले आहे. (Maharashtra TET Exam Scam)
Tukaram Supe

Tukaram Supe

Sarkarnama

Published on
Updated on

पुणे : आरोग्य विभाग, म्हाडा आणि आता `टीईटी" (शिक्षक पात्रता परीक्षा Maharashtra TET Exam) परीक्षेतील साखळीचा छडा पुणे पोलिसांनी लावला आहे. या परीक्षेत गैरप्रकार केल्यावरून पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यास अटक केली. त्यानंतर रात्री त्याच्या घरी छापा टाकला असता सुमारे 88 लाख रुपयांची रोकड सापडली. ती जप्त करण्यात आली आहे. सुपे याने प्रीतीश देशमुख आणि परिषदेच्या तांत्रिक विभागाचा सल्लागार अभिषेक सावरीकर याच्यासह सुमारे सव्वा चार कोटी रुपयांची रक्कम लाटल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. (tet paperleak 2021)

या आरोपीनी उमेदवारांकडुन 4 कोटी 20 लाख रूपये जमा करुन ते आपापसांत वाटून घेत विद्यार्थ्यांना परीक्षेत पात्र केल्याचे उघड झाले आहे.

Tukaram Supe

पेपर फुटीचे सत्र सुरूच, टीईटी परीक्षेतही गैरव्यवहार झाल्याचे उघड

म्हाडाच्या पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख (रा. खराळवाडी, पिंपरी ), अंकुश रामभाऊ हरकळ (रा. किनगावराजा, ता. सिंधखेडराजा,जि. बुलढाणा), संतोष लक्ष्मण हरकळ (रा. मिलेनियम पार्क, औरंगाबाद) यांना अटक केली होती. त्याननंतर सायबर पोलिसांना संशयीत आरोपी डॉ. प्रितिश देशमुख याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी 2020 मध्ये झालेल्या टीईटी परिक्षेत अपात्र झालेल्या 40 हून अधिक विद्यार्थ्यांची हॉल तिकीटे सापडली होती. तसेच डॉ. देशमुखच्या चौकशीमध्ये राज्य परीक्षा परिषदेच्या एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव पुढे आले होते. त्यानंतर संशयाची सुई राज्य परीक्षा परिषदेकडे वळली होती.

Tukaram Supe

आरोग्य विभाग परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी सोमवारी रात्री आणखी चार जणांना अटक

दरम्यान सायबर पोलिसांनी सुपे यास गुरुवारी सकाळी चौकशीसाठी बोलावले होते. त्यांनंतर दिवसभर व रात्री उशीरापर्यंत त्याची चौकशी करुन त्यास अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सुपे याने शिक्षक पात्रता परीक्षेत लाच घेऊन उमेदवारांना पास केल्याचा ठपका ठेवला होता. त्यानुसार, पोलिस चौकशी करीत होते. तेव्हा डॉ. देशमुख, सुपे, सावरीकर यांनी संगनमत केल्याचे उघड झाले. 19 जानेवारी 2020 मध्ये टीईटीची परीक्षा झाली होती. यातील परीक्षार्थींची माहिती एजंटांच्या मदतीने त्यांनी माहिती मिळविली. त्या परीक्षार्थींना पात्र करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून प्रत्येकी 50 हजार ते 1 लाखांपर्यंत रकमा स्वीकारून साधारण4 कोटी 20 लाख रूपये जमा करुन ते आपापसांत वाटून घेतले आणि विद्यार्थ्यांना परीक्षेत पात्र केले. यात तुकाराम सुपे यांनी 1.70 कोटी, प्रीतिश देशमुख 1.25 कोटी आणि अभिषेक सावरीकर यास 1.25 कोटी रुपये घेतल्याचे चौकशीत कबूल केले आहे. याप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी फिर्याद दिली.

Tukaram Supe

पेपर फुटीप्रकणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेंना अटक

-सुपेच्या घरी गुरुवारी रात्री सायबर पोलिसांनी छापा घातला. त्यामध्ये 88 लाख रुपये कॅश आणि सोनं सापडले

- ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना पेपर लिहू नका, तसेच रीचेकिंग ला द्या असं सांगायचे

- 35 हजार ते 1 लाख रुपये ते घेणार होते.

- 4.5 कोटी जमा झाले अशी प्राथमिक माहिती आहे.

- विद्यार्थ्यांनी सुरुवातीला माहिती दिली त्यातून लिंक शोधत सुपेपर्यंतची साखळी पुढे आली.

- दोन पेपरफुटी प्रकरणांचा तपास करताना `म्हाडा`ची लिंक लागली. म्हाडाच्या लिंकमधून सीईटीचा घोटाळा पुढे आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com