Pune News : 70 पब, 30 ढाबे, 32 बिअर शॉपी अन् कोट्यवधींची वसुलीच वसुली, शंभुराज देसाईंच्या 'एक्साइज'ची अब्रुच काढली

Ravindra Dhangekar News : रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुक्ल कार्यालयात जात एकच गोंधळ घातला. त्यासह पोलिसांसमोर थेट हफ्त्याची आकडेवारीच वाचून दाखवली.
ravindra dhangekar
ravindra dhangekar sarkarnama

Ravindra Dhangekar On Excise Deparment : पुण्यातील बेकायदा पब, दारू विक्री करणारे ढाबे, बिअर शॉपीच्या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आवाज उठवून थेट पुण्यातील उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय गाठले. या खात्याच्या अधिकक्षांच्या केबिनमध्ये घुसून पब, ढाबे, वाइन आणि शॉपीकडून केल्या जाणाऱ्या वसुलीची यादीच मांडली. त्यातून लाखो रूपयांच्या वसुलीचे आकडे पुढे आलेत. पुणे शहर आणि परिसरातील 70 पब, 30 ढाबे, 32 बिअर शॉपी आणि काही वाइन शॉपींकडून उत्पादन शुक्ल खात्याचे अधिकारी प्रत्येक पन्नास ते दीड लाखांपर्यंत रूपयांची वसुली करत असल्याचे धक्कादायक पुरावे पुढे आले आहेत. त्यावरून आमदार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ), शिवसेना नेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) यांच्यासह पुण्यातील नेत्यांनी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत.

नेते आणि अधिकाऱ्यांमध्ये समोरासमोरच हा प्रकार घडल्यानं अनेक धक्कादायक बाबी पुढे येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कल्याणीनगरमधील अपघातचे कनेक्शन राज्य उत्पादन खात्याचा कारभार खोलवर गेला असून त्यातून या खात्याची अब्रुच चव्हाट्यावर आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी हातात बनावट पैसे घेऊन उत्पादन शुक्ल मंत्री शंभूराज देसाई यांचा '50 खोके'चा बोर्डही झळकवण्यात आला.

ravindra dhangekar
Pune Police: पुणे 'कार'नामा; आरोपीच्या बापाचा डॉक्टरांना आला फोन अन् रक्ताचे सॅम्पल डस्टबिनमध्ये...

एक लाख रूपयांचा हफ्ता तुम्हाला मिळतो, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी उत्पादन शुक्लाच्या अधिकाऱ्यावर केला. त्यावर अधिकाऱ्यानं चुकीचं आरोप करत असल्याचं म्हटलं. त्यानंतर धंगेकर संतापल्याचं पाहायला मिळाले. "ओ साहेब तुम्ही चुकीचं आणि खरं बोलायचं नाही. तुम्ही जे करत आहात, ते पाप करताय. तुम्ही महिन्याला 70 ते 80 लाख रूपये हफ्ता घेता, त्याची यादी आमच्याकडे आहे. तुम्ही स्वत:ला शहाणे समजता काय? पुणे उध्वस्त केलं. तुम्हाला लाज कशी वाटत नाही. तुम्ही मला विधानसभेत उत्तर देण्यासाठी उभे राहिलात का?" असं रौद्ररूप धंगेकरांनी घेतलं.

( Edited By : Akshay Sabale )

ravindra dhangekar
Pune Police: पुणे 'कार'नामा; आरोपीच्या बापाचा डॉक्टरांना आला फोन अन् रक्ताचे सॅम्पल डस्टबिनमध्ये...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com