पुणे : पुणे महापालिकेच्या एका अभियंत्याने तरूणांना नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादाक प्रकार समोर आला आहे. सिंहगड रस्ता महापालिका क्षेत्रीय कार्यालयातील सूरज पवार (Suraj Pawar) या कनिष्ठ अभियंत्याने उमेदवारांना नोकरीचे आमिष दाखवले. त्यांच्याकडून पैशांची मागणी केली. सूरज पवार या कनिष्ठ अभियंत्याचे निलंबन करण्यात आले असून, चौकशी सुरू केली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत.
पुणे महापालिकेची सध्या ४४८ रिक्त जागांची भरती प्रक्रीया आहे. यामध्ये उमेदवारांची आॅनलाइन परीक्षाही पूर्ण झाली. काही पदांसाठी निकाल जाहीर झाली असून, पात्र उमेदवारांसाठी निवड प्रक्रीयेचा टप्पा सुरू झाले आहे. पदभरती अत्यंत पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी पालिकटचे प्रयत्न सुरू आहेत.
लेखी परीक्षेत काही गैरप्रकार होण्याची शक्यता नसली, तरी उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीच्या दरम्यान पैशांची मागणी होण्याची शक्यता आहे. तसेच या बाबतीत काही एजंट सक्रिय झाल्याचे समजते आहे.
कनिष्ठ अभियंता या पदासाठी निकाल जाहीर झाले. कागदपत्र तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. या पदांसाठी मोठी स्पर्धा दिसून येते. यामुळे सूरज पवार यांनी काही उमेदवारांशी संपर्क साधून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. ५ ते १० लाख रुपये तो मागणी करत असल्याची माहिती आहे.
याबाबतीत अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्याकडे तक्रार आली. त्यांनी पवार यांचे निलंबन करून यासंबंधी चौकशीचे आदेश दिले आहेत. उपायुक्त इथापे यांनी यासंबधीचे आदेश काढले.आजा सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप आव्हाड यांना सूरज पवार यांची चौकशी करून, याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.