मोठी बातमी! पुण्यात शिवाजीनगर कोर्टाबाहेर भरदिवसा फायरिंग अन् कोयत्याने वार, परिसरात प्रचंड खळबळ!

Shivajinagar court firing incident Pune : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट नंबर 4 बाहेर भरदिवसा गोळीबाराची घटना घडली. या प्रकारामुळे न्यायालय परिसरात खळबळ उडाली असून घटनेची चर्चा सुरू आहे.
मोठी बातमी! पुण्यात शिवाजीनगर कोर्टाबाहेर भरदिवसा फायरिंग अन् कोयत्याने वार, परिसरात प्रचंड खळबळ!
Sarkarnama
Published on: 
Updated on: 

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय परिसरात गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या गेट नंबर 4 बाहेर भरदिवसा गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या 2 दिवसांपूर्वीच पुणे न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. या पार्श्वभूमीवर आता न्यायालयाबाहेर थेट गोळीबार झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट नंबर 4 जवळ काही वेळापूर्वी हा प्रकार घडला. यावेळी गोळीबारासोबतच कोयत्याने वार करण्यात आल्याचीही माहिती समोर येत आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच गोंधळ उडाला. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक आणि न्यायालयात आलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मोठी बातमी! पुण्यात शिवाजीनगर कोर्टाबाहेर भरदिवसा फायरिंग अन् कोयत्याने वार, परिसरात प्रचंड खळबळ!
Gokul Milk Union: गोकुळ दूध संघाच्या सत्तेचा आज दुपारपर्यंत फैसला; शासन नियुक्त संचालक अन् अध्यक्षपदाचा तिढा सुटणार!

गोळीबार नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. वैयक्तिक वादातून हा प्रकार घडला की यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. न्यायालय परिसरात पोलिसांची हालचाल वाढली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळाची पाहणी करून गोळीबाराच्या घटनेशी संबंधित माहिती गोळा केली जात आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच पुणे न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याची घटना ताजी असतानाच आता न्यायालयाच्या गेटबाहेर गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. न्यायालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी अशा घटना घडत असल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.