Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्यावर बलात्काराचा गुन्हा, अटकेसाठी पोलिसही रवाना; लग्नाचं अमिष अन् 14 वर्ष वारंवार...

Pune ZP Mangesh Jagtap Police : पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. बंडगार्डन पोलिसांनी हा गुन्हा माळेगाव पोलिसांकडे वर्ग केला आहे.
Police have registered a case against Pune Zilla Parishad member Mangesh Jagtap following serious allegations. The investigation is currently underway.
Police have registered a case against Pune Zilla Parishad member Mangesh Jagtap following serious allegations. The investigation is currently underway.Sarkarnama
Published on
Updated on

Pune Zilla Parishad member rape case: पुणे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू असताना अंगावर पेट्रोल अंगावर टाकून आत्मदहनाचा प्रयत्न एका तरुणीने केला होता. या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बारामतीमधील जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर लग्नाच्या अमिषाने फसवणूक करत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप तिने केला होता.

या प्रकरणी लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक तसेच वारंवार बलात्काराचा गुन्हा पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात मंगेश जगताप यांच्या विरोधात दाखल केला होता. तो आता माळेगाव पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांनी या प्रकरणा विषयी माहिती देताना सांगितले की, हा गुन्हा माळेगाव हद्दीत घडल्याने बंडगार्डने पोलिसांनी तो माळेगाव पोलिसांकडे वर्ग केला आहे. या प्रकरणाची तक्रार करणारी फिर्यादी तरुणी ही सामाजिक कार्यकर्ता आहे.

आरोपीने लग्नाचे अमिष दाखवून 2012 ते 2026 या कालावधीत लग्नाचे अमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचे आरोप आहे. तसेच आरोपीने फिर्यादी तरुणीकडून आठ ते दहा लाख रुपये घेत आर्थिक फसवणूक देखील केली. आरोपी मंगेश जगताप याच्या अटकेसाठी पोलिसांची टीम रवाना करण्यात आल्याचेही चैतन्य कदम यांनी सांगितले.

Police have registered a case against Pune Zilla Parishad member Mangesh Jagtap following serious allegations. The investigation is currently underway.
Pune Police Bishnoi Gang Operation : पुण्याच्या पोलिसांच्या मास्टर प्लॅनने 'बिश्नोई' गँगचा गेम उधळला : थेट राजस्थनात जाऊन धडक कारवाई

पीडित तरुणीने आपबीती सांगितली

पीडिती तरुणीने सांगितले की, काॅलेजच्या जीवनापासून मंगेश जगताप सोबत त्यांचे प्रेमसंबंध होते. लग्नाचे आश्वासन देऊन तो अनेक वर्ष संबंध ठेवले. मात्र त्याने गुपचूप दुसरे लग्न केले. या विषयी त्याला विचारले असता आपला घटस्फोट झाला असल्याचे त्याने कागदपत्र दाखवली. मात्र, ही सर्व कागदपत्र बनावट असल्याचे तपासात पुढे आले.

आम्ही लग्न करणार होते म्हणून मी 29 आणि 30 तारखेला रिसाॅर्ट बूक केले होते. त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. मात्र गेली तीन महिनेत तो मला पाहिले तर पळून जात होता. तो 21 वर्ष माझ्या आयुष्याशी खेळला. या संपूर्ण कुटु्ंबात मंगेशला त्याच्या कुटुंबाने, त्याची पोलिस असलेल्या मेव्हणीने आणि त्याचे दोन मित्र अमर जगताप आणि रणजीत तांबडे यांनी साथ दिल्याचा आरोप देखील पीडित तरुणीने केला.

Police have registered a case against Pune Zilla Parishad member Mangesh Jagtap following serious allegations. The investigation is currently underway.
Pune ZP : धक्कादायक! पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; झेडपी सदस्यावर गंभीर आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com