MPSC Student Protest : पुण्यातील MPSC आंदोलनात राहुल गांधींची एन्ट्री; म्हणाले, "विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत..."

Rahul Gandhi on Pun MPSC Student Protest : राहुल गांधी म्हणाले, "विद्यार्थ्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत. एमपीएससीच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा आणि त्यांच्या जागी प्रामाणिक व सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. तसेच, राज्यातील ७० हजारांहून अधिक रिक्त सरकारी पदांची तातडीने भरती करावी. या मागण्या अवाजवी नाहीत."
Rahul Gandhi has backed the MPSC student protest in Pune
Rahul Gandhi has backed the MPSC student protest in Pune, supporting demands for transparent examinations and government recruitment.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune MPSC Student Protest : पुण्यात मागील काही दिवसांपासून एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील गोंधळ आणि पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांनी MPSC आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावी ही प्रमुख मागणी या विद्यार्थी आंदोलकांची आहे. अनेक विरोधकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

अशातच आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील या आंदोलनावर भाष्य केलं आहे. राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट करत आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असल्याचं म्हटलं आहे. शिवाय विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवणाऱ्या संस्थेवरच कब्जा केला गेला असून आम्ही हे असं चालू देणार नाही, असा इशारा देखील गांधी यांनी आपल्या पोस्टमधून सरकारला दिला आहे.

राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, "पुण्यात ‘छात्रों की गूँज’ या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध समस्या माझ्यासमोर मांडल्या होत्या. यामध्ये पेपरफुटी, रखडलेल्या भरती प्रक्रिया, महागडे शिक्षण, वसतिगृहांमधील असुविधा, निकृष्ट दर्जाचे अन्न आणि DBT मध्ये होणारी फसवणूक, अशा अनेक प्रश्नांकडे विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले होते.

त्यावेळी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एमपीएससीमध्ये सुधारणा करण्याची, परीक्षा व्यवस्था पारदर्शक करण्याची आणि विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आज हेच विद्यार्थी पुण्यात सत्याग्रह आंदोलनाला बसले आहेत.

Rahul Gandhi has backed the MPSC student protest in Pune
KDMС News : कोट्यवधींच्या उधळपट्टीवर पनवेल महानगरपालिका ट्रोल होताच केडीएमसीचा आदर्श निर्णय; 25 लाख रुपये दुष्काळग्रस्तांसाठी

विद्यार्थ्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत. एमपीएससीच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा आणि त्यांच्या जागी प्रामाणिक व सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. तसेच, राज्यातील ७० हजारांहून अधिक रिक्त सरकारी पदांची तातडीने भरती करावी. या मागण्या अवाजवी नाहीत. या मागण्यांवर केवळ आश्वासने न देता ठोस कार्यवाही होणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आपले आंदोलन सत्याग्रहाच्या माध्यमातून पुढे नेले आहे. युवा काँग्रेस आणि एनएसयूआय या आंदोलनात सातत्याने विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहेत. विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहन मी त्यांना केले आहे," अशी माहिती त्यांनी पोस्टमधून दिली आहे.

Rahul Gandhi has backed the MPSC student protest in Pune
Gokul Election News : गोकुळ दूध संघाचं अंतिम जागावाटप ठरलं, CM फडणवीसांचा ग्रीन सिग्नल : राष्ट्रवादी, भाजपसह कोणाला किती जागा?

शिवाय मी हा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारसमोर ठामपणे मांडणार असून, या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी करणार आहे आणि विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवणाऱ्या संस्थेवरच कब्जा केला असून आम्ही हे चालू देणार नाही, असा इशाराच राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमधून दिला आहे. त्यामुळे आता राहुल गांधींची देखील MPSC च्या आंदोलनात एन्ट्री झाल्याचं पाहायला मिळत असून सरकार यावर नेमका काय तोडगा काढणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com