Pune court hearing : राहुल गांधी यांच्याविरोधातील लंडन भाषण बदनामी खटल्यात ऐनवेळी मोठा ट्विस्ट; न्यायालयाकडून व्हॉईस सॅम्पलच्या अर्जाला स्थगिती

Satyaki Savarkar complaint News : पुण्यातील प्रथमवर्ग विशेष न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात फिर्यादी सात्यकी सावरकर यांची मुख्य साक्ष पूर्ण झाली असून, सध्या त्यांचा उलटतपास, क्रॉस-एक्झामिनेशन राहुल गांधी यांच्या वकील अ‍ॅड. मिलिंद दत्तात्रय पवार यांच्याकडून सुरू आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi sarkarnama
Published on
Updated on

Pune News : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लंडन येथे केलेल्या भाषणावरून दाखल झालेल्या बदनामी खटल्यात नवीन घडामोडी घडल्या आहेत. पुण्यातील प्रथमवर्ग विशेष न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात फिर्यादी सात्यकी सावरकर यांची मुख्य साक्ष पूर्ण झाली असून, सध्या त्यांचा उलटतपास, क्रॉस-एक्झामिनेशन राहुल गांधी यांच्या वकील अ‍ॅड. मिलिंद दत्तात्रय पवार यांच्याकडून सुरू आहे.

या प्रकरणात गेल्या सुनावणीत फिर्यादीकडून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या आवाजाचा नमुना घेण्याचा अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने राहुल गांधी यांच्या वकिलांचे म्हणणे मागवले होते. मात्र, आता फिर्यादीकडूनच हा अर्ज सध्या स्थगित किंवा प्रलंबित ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे आवाजाच्या नमुन्यावरील सुनावणी तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

Rahul Gandhi
BJP political News : 50 खोके एकदम ओके? मुख्यमंत्री भेटलेल्या बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश अन् व्हिडीओ व्हायरल...

त्यासोबतच, खटला दाखल झाल्यानंतर तत्कालीन न्यायाधीश जैन यांच्या न्यायालयात झालेल्या युक्तिवादानंतर फिर्यादीने 5 ऑगस्ट 2023 रोजी प्रमुख जिल्हा न्यायाधीशांकडे ट्रान्सफर पिटीशन दाखल केली होती. त्यानंतर प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी 18 ऑगस्ट 2023 रोजी संबंधित न्यायाधीशांकडून गोपनीय अहवाल मागवला होता.

Rahul Gandhi
Shivsena VS BJP : शिवसेना नेत्याचा भाजपवर मोठा आरोप; 25 लाख देऊन राष्ट्रवादी नगरसेवकाला फोडले

15 सप्टेंबर 2023 रोजी हा गोपनीय अहवाल सादर करण्यासंबंधीचा अर्ज अ‍ॅड. मिलिंद पवार यांनी केला होता. मात्र, आता या अर्जालाही स्थगित ठेवण्याची विनंती करण्यात आल्याने तोही प्रलंबित ठेवण्यात आला आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी आणि फिर्यादी सात्यकी सावरकर यांचा उलटतपास 12 मार्च 2026 रोजी होणार आहे.

Rahul Gandhi
NCP News: दिलेली जबाबदारी चोख पार पाडली... वळसे पाटलांनी खास बोलावून दिली कौतुकाची थाप अन् पत्रही!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com