Shivsena News; शिंदे गटात सध्या रेट कार्डनुसार पक्षप्रवेश?

वाघाच्या जबड्यात हात घालणारे फडणवीस अटकेला का घाबरत होते?
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on: 
Updated on: 

नाशिक : (Nashik) राज्याचे (Maharashtra) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे सध्या सातत्याने महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) काळात मला अटक करण्याचे कारस्थान रचल्याचे सांगतं आहे. परंतू हा फक्त त्यांचा कांगावा आहे. अटक झाल्यानंतर त्यांना प्रकाश झोतात यायचं होतं, असा आरोप शिवसेना (Shivsena) नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. (Shivsena leader Sanjay Raut criticise Devendra Fadanvis)

Sanjay Raut
Breaking News; शिवसेना महानगरप्रमुख बडगुजर यांना एक वर्ष कारावास!

त्यावेळचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सभ्य व सुसंस्कृत होते. आम्ही वाघाच्या जबड्यात हात घालणारे असल्याचे सांगणारे फडणवीस अटकेला का घाबरत होते?, असा सवाल राऊत यांनी केला.

Sanjay Raut
Balasaheb Thorat : कथित नाराजीपत्रावर थोरात म्हणाले, 'अरे.. अरे.. मी कधी नाराज...'

भाजपच्या नाशिक मधील अधिवेशनावरून टिका करताना ते म्हणाले, भाजपच्या कार्यकारीणीच्या बैठकीत नाशिक मध्ये कमळचं फुलणार असा नारा दिला गेला परंतू नाशिकमध्ये भगवाच फडकणार व आम्ही फडकवून दाखवू असा विश्वास व्यक्त केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नाशिकवर प्रेम होते. मात्र आता गिरीश महाजन यांच्या सारख्यांकांनी नाशिकची जी परिस्थिती केली, त्यामुळे नाशिककरांना वीट आला आहे. नाशिक ही पवित्र जागा आहे. येथे सगळी पापं रामकुंडामध्ये बुडवली जातात, या भाजपला देखील आम्ही इथेच बुडवू, असा इशारा दिला.

पक्ष प्रवेशाचे रेट कार्ड

नाशिक ही पवित्र जागा असली तरी हल्ली नाशिकमध्ये टोकन देण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. रेट कार्डनुसार प्रवेश होत आहेत. प्रथम ऑर्डर दिली जाते. व्यापारात जसे टोकन दिले जाते तसे राजकारणात काही लोकांना टोकन दिले जाते. मग आमच्या नाशिक दौयाचा मुहूर्त बघून प्रवेश करतात. अशी उपरोधिक टिका राऊत यांनी केली.

शिवनेरीवर या पण..

अमित शहंना महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिर्वाद लाभणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचे त्यांनी शेवटपर्यंत समर्थन केले आहे. त्यांच्या अभिनंदनाचा ठराव देखील मंजूर केला. महाराष्ट्रातला समाज त्यांना पाठिंबा देईल असं वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. शिवनेरीवर जरूर जावे व छत्रपती शिवाजी महाराज ज्या मातीत जन्मले. त्या मातीतून जर काही पवित्र गोष्टी घेऊन जा असा सल्ला खा. राऊत यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.