Raj Thackeray : शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या सुरात राज ठाकरेंचाही सूर : राहुल गांधींचा आरोप भाजपला आणखी जड जाणार

Rahul Gandhi issue Maharashtra News : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे.
raj thackeray
raj thackeray sarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करून मोठ्या प्रमाणात मतांची चोरी होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी हाच मुद्दा उचलून धरण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत.

पुण्यात झालेल्या एका मेळाव्यात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी महापालिका निवडणुकीसाठी रणनीती आखताना मतचोरीच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने (Shivsena) बेस्ट निवडणुकीत एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुण्यात प्रथमच राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मतचोरीच्या मुद्द्यावर आक्रमकपणे भूमिका मांडली.

raj thackeray
CJI Bhushan Gawai : "खूप त्रास झाला, बरं झालं ते रिटायर झालेत"; माजी न्यायमूर्तींच्या निवृत्तीवर सरन्यायाधीशांचा सुटकेचा निश्वास

राज ठाकरे (Raj Thackery) म्हणाले, “2016-17 पासून मी सांगतोय की मतांमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड आहे. या बाबी मी शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्यासमोर मांडल्या होत्या, पण ऐनवेळी त्यांनी पाठ फिरवली. हा मुद्दा जागतिक स्तरावर न्यावा लागेल. लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला तर ही जागतिक बातमी बनेल आणि परदेशातून दबाव येईल, तेव्हा सत्ताधाऱ्यांना जाग येईल.”

raj thackeray
BJP vs Shivsena : उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपमध्ये आलेल्या वैशाली सूर्यवंशींचा शिंदेंच्या आमदारावर हल्लाबोल

राहुल गांधी यांच्या आरोपांना पाठिंबा देताना राज ठाकरे म्हणाले, “आता राहुल गांधी यांनी हा मुद्दा उचलला आहे. मतांमध्ये गडबड होत आहे, मते चोरली जात आहेत. लोकांनी आपल्याला मते दिली, पण ती आपल्यापर्यंत पोहोचलीच नाहीत. मतांची चोरी करून हे सत्तेवर आले आहेत.”

raj thackeray
Mumbai BMC election: मुंबई महापालिकेच्या 'या' 50 जागा ठरणार गेमचेंजर! मुस्लिम मतदारांच्या हाती सत्तेच्या चाव्या!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राज ठाकरे म्हणाले, “भाजपला 132, शिंदे गटाला 56 आणि अजित पवार गटाला 42 जागा मिळाल्या. एकूण 232 जागांच्या आसपास बहुमत मिळाले, पण तरीही महाराष्ट्रात सन्नाटा का होता? कारण जे विजयी झाले त्यांना निकाल पचनी पडत नव्हते आणि जे पराभूत झाले त्यांना ते मान्य नव्हते. हा सगळा मतांचा गोंधळ होता.” त्यांनी निवडणूक आयोगावर टीका करताना म्हटले, “राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर निवडणूक आयोगाने चौकशी का केली नाही? कारण अशी चौकशी झाली तर गेल्या 10-12 वर्षांतील गैरप्रकार उघड होतील.”

raj thackeray
BJP News : लातूरमधील 52 हजार लाडक्या बहि‍णींनी देवेंद्र फडणवीसांना पाठवल्या राख्या!

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वांनी आपापल्या भागातील मतदार यादीवर लक्ष ठेवावे. या मतदार यादी बाबत प्रभागातील लोकांची जनजागृती करावी, अशा देखील सूचना राज ठाकरे यांनी निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक मंडळींना दिल्या आहेत.

raj thackeray
Jayant Patil Exclusive : रिलॅक्स झालेले जयंत पाटील म्हणतात, 'रेंजमध्ये आल्यावर टप्प्यात कार्यक्रम...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com