By Poll Election : आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर चिंचवडमध्ये पोटनिवडणूक लागली. येथे भाजपकडून दिवगंत आमदारांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तर महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (ठाकरे गट) प्रबळ दावेदार असलेले राहुल कलाटे (Rahul Kalte) यांनी बंडखोरी केली. त्यांनी अर्ज मागे घेण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे चिंचवडमधून तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. येथील सर्व उमेदवार तुल्यबळ असल्याने या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
कसबा आणि चिंचवड (By Election) या दोन्ही मतदार संघात महाविकास आघाडीत बंडखोरी झाली होती. आजपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत होती. दरम्यान कसब्यातील काँग्रेसचे बंडखोर बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dabhekar) यांची मनधरणी करण्यात यश आले. त्यातून दाभेकर यांनी काल आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
त्याच पद्धतीने चिंचवडमधील बंडखोर राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनाही अर्ज माघारी घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पिंपरी-चिंचवड येथील मेळाव्यात सांगितले होते. कलाटे यांची अखेरच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीतील मोठ्या नेत्यांनी मनधरणी केली. मात्र ते प्रयत्न निषफळ ठरले.
पोटनिवडणुक जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीकडून आपल्याचा उमेदवारी मिळेल असा विश्वार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांना होता. त्यासाठी ते २०१९ च्या निवडणुकीचा ते दाखला देत होते. २०१९ मध्ये भाजपचे दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांना सुमारे दीड लाख मते तर कलाटे यांना एक लाख बारा हजार मते मिळाली होती. मोदी लाटेतही लाखाहून जास्त मते मिळाल्याने आपल्यालाच उमेदवारी मिळावी, अशी आशा त्यांना होती. महाविकास आघाडीकडून मात्र राष्ट्रवादीचे नाना काटे (Nana Kate) यांना उमेदवारी दिली आणि कलाटे यांनी बंडखोरी केली.
अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर (Sachin Aher) यांनी कलाटे यांची भेट घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackerey) यांनी कलाटे यांच्याशी फोनवरून बोलणे झाले. ठाकरे यांचाही अर्ज माघारी घेण्याचा आदेश कलाटे यांनी डावलला.
बंडखोरी केल्यानंतर अजित पवार यांनी कलाटे यांना प्रत्येक वेळी परिस्थिती सारखीच राहत नसते. परिस्थिती बदलते तसेच मतांचा आकडाही बदलतो, असे सांगत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची सूचना केली होती.
दरम्यान अर्ज भरण्यापूर्वीपासून राष्ट्रवादीचे चिंचवड निवडणूक प्रभारी आमदार सुनील शेळके यांच्यासह अनेक मान्यवरांनी कलाटे यांची मनधरणीचा प्रयत्न केले. मात्र सर्व प्रयत्न निष्फळ झाले आहेत. यावेळी राहुल कलाटे म्हणाले एक लाख बारा हजार आणि इतर नागरिकांच्या भावनांचा आदर करीत निडणूक लढणविणार आहे.
यावेळी बोलताना राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी प्रथम दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर कलाटे म्हणाले, "उद्धव ठाकरे, अजित पवार (Ajit Pawar) तसेच प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मला अर्ज माघारी घेण्यासाठी प्रयत्न केले, त्यांच्या प्रती आदर व्यक करतो. मागील विधानसभेत एक लाख बारा हजार नागरिकांनी माझ्या चिन्हापुढील बटन दाबलं होतं."
पुढे त्यांनी तत्कालीन सत्तेचाही उल्लेख करून जनतेचा भावनेचा आनादर करू शकत नसल्याचे कलाटे यांनी स्पष्ट केले.
कलाटे म्हणाले, "त्यावेळी देशात भाजपची लाट होती. भाजपची महापालिकेत, राज्यात, देशात सत्ता होती. असं असतानीही ही लोकं माझ्यासाठी बाहेर आली. आजपर्यंत मी सर्व स्तारातील कार्यकर्त्यांशी बोललोय. त्या प्रत्येकांच म्हणणं आहे की मी लढलं पाहिजे. नेत्याच्या मनधरणीचा आदर करताना आमचा अनादर करू नकोस. त्यामुळे मला चिंचवडच्या जनतेचा आदर करणे क्रमप्राप्त होते. लोकभावना आणि जनतेचा पाठिंबा या जिवावर मी निवडणुकीला सामोरे जात आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.