

Pimpri News: कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आज पहाटे कर्जत (जि.रायगड) येथील आपल्या एन.डी.स्टुडिओत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे सिनेमा क्षेत्र हादरून गेले आहे. नितीनदादांच्या जाण्याने पोरका झाल्याची भावना अभिनेते आणि खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, आर्थिक कारणातून नितीन देसाईंनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.
नितीनदाच्या निधनाच्या बातमीवर विश्वासच बसत नाही, अशी प्रतिक्रिया शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार डॉ.कोल्हे यांनी दिली. त्यांचे व नितीन देसाई यांचे खूप जुने सबंध होते. त्यांना ज्या 'राजा शिवछत्रपती' मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली, त्या मालिकेचे निर्माते नितीन देसाई होते. त्यामुळे त्यांच्या अचानक जाण्याने नाते पोरके झाल्याची भावना निर्माण झाली आहे, अशी खंत डॉ.खासदार कोल्हे यांनी व्यक्त केली.
कलाक्षेत्रातील आजवरच्या प्रवासात मला लाभलेले नितीनदादांचे मार्गदर्शन आणि त्यांची साथ माझ्यासाठी खूप मोलाची ठरली आहे. अशी कृतज्ञतेची भावना त्यांनी व्यक्त केली. नितीन देसाईंच्या निधनाची बातमी माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे, असे ते म्हणाले.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना देसाई कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच देसाई कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो आणि नितीनदादांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी प्रार्थना त्यांनी आई-जगदंबेकडे केली.
कर्जत येथील देसाईंचा ५२ एकरातील स्टुडिओ आलिशान आहे. कुठलाही सेट लीलया आणि तत्पर उभारण्यात त्यांची ख्याती होती. महाराष्ट्रात कुणाचेही सरकार येवो, त्याचा देखणा स्टेज ते अल्पावधीत उभा करून देत होते. आर्थिक कारणातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.