Salim Kutta Update : सलीम कुत्ताविषयी येरवडा कारागृह प्रशासन म्हणतंय ; "तो गेल्या सहा वर्षांपासून..."

Yerwada jail News : दाऊद इब्राहिम टोळीतील गुंड मोहम्मद सलीम मीर शेख उर्फ सलीम कुत्ता सध्या नाशिकमधील पार्टीमुळे चर्चेत आला आहे.
Salim Kutta Update
Salim Kutta UpdateSarkarnama
Published on
Updated on

Pune News : भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी दोन दिवसापूर्वी विधानसभेत नाशिकचे ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा सलीम कुत्तासोबतचा एक फोटो आणि व्हिडीओ दाखवत त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे ठाकरे गट काहीसा बॅकफूटवर गेला आहे. यावरुन आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चांगलंच तापलं आहे. तो मुंबईच्या 1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा भोगत आहे. पण त्याचवेळी सलीम कुत्ता याची हत्या झाल्याचा दावाही पुढे आला होता.आता सलीम कुत्ता हा येरवडा कारागृहात असल्याचा दावा कारागृह प्रशासनाने केला आहे.

सलीम कुत्ता (Salim Kutta) याचं खरं नाव मोहम्मद सलीम मीर शेख असं आहे. तो 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी आहे.आमदार नितेश राणेंनी सलीम कुत्ता यांच्या पार्टीत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी त्याच्यासोबत डान्स केल्याचा व्हिडीओ दाखवल्यामुळे खळबळ उडाली आहे. मात्र, यावरुन सलीम कुत्ता कोण आहे याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

Salim Kutta Update
Uddhav Thackeray News : असे काय घडले? उद्धव यांनी जाहीरपणे मानले शर्मिला ठाकरेंचे आभार

दाऊद इब्राहिम टोळीतील गुंड मोहम्मद सलीम मीर शेख ऊर्फ सलीम कुत्ता सध्या नाशिकमधील पार्टीमुळे चर्चेत आला आहे. पण तो सहा वर्षांपासून येरवडा कारागृहात (Yerwada Jail) असून, या कालावधीमध्ये एकदाही त्याची जामिनावर किंवा पॅरोलवर मुक्तता झाली नसल्याची माहिती कारागृह प्रशासनाने सोमवारी दिली. त्यामुळे विधानसभेच्या अधिवेशनामध्ये शिवसेनेचे (उबाठा गट ) शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या कथित सहभागाची सादर करण्यात आलेली ध्वनिचित्रफीत 2016 पूर्वीची असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई बॉम्बस्फोटांप्रकरणी सलीम कुत्ता याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यापूर्वी त्याला नाशिक कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यावेळी तो दहा दिवस संचित रजेवर (पॅरोल) मुक्त होता. संबंधित ध्वनिचित्रफीत त्यावेळची असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सलीम कुत्ता 2016 पासून येरवडा मध्यवर्ती कारागृहातील अंडा सेलमध्ये आहे. या काळात त्याची एकही दिवस कारागृहातून मुक्तता झाली नाही. त्याची मुलगी आणि जावई 2020 मध्ये अधिकृत परवानगी घेऊन त्याला भेटले होते, अशी माहिती कारागृह प्रशासनाकडून देण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सलीम हा मूळचा तामिळनाडूमधील तंजावरधील कुट्टा गावाचा रहिवासी आहे. उदरनिर्वाहासाठी तो ९० च्या दशकात मुंबईत आला होता. तेथे तो दाऊद टोळीतील गुंड महंमद डोसा याच्या माध्यमातून दाऊद इब्राहिमच्या संपर्कात आल्या. त्याच्याविरुद्ध पायधुनी, कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. मुंबईमध्ये १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात त्याचा हात असल्याचे तपासात आढळून आले होते. बाॅम्बस्फोट प्रकरणात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.(Mumbai Blast)

कुत्ता नावामुळे आपली बदनामी...

कुत्ता नावामुळे आपली बदनामी होते असा दावा करून 'टाडा' न्यायालयात त्याने नावातून कुत्ता हा शब्द वगळण्याची विनंती केली होती. ती न्यायालयाने मान्य केली होती.दाऊद टोळीतील महंमद सलीम मीर शेख उर्फ सलीम कुत्ताची गुन्हेगारी जगतात क्रूर अशी ओळख होती.आक्रमकतेमुळे सलीम कुत्ता असे टोपणनाव पडले.

(Edited By Deepak Kulkarni)

Salim Kutta Update
Nagpur Winter Session : सरकारचं चाललंय तरी काय? विधानसभेत यशोमती ठाकूर कडाडल्या

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com