Rahul Kul: अजितदादांनी खासगीत दिलेला उमेदवारीचा शब्द! भाजप आमदार राहुल कुल यांचा तब्बल 35 वर्षांचा बालेकिल्ला राष्ट्रवादीकडून काबीज

Rahul Kul: दौंड तालुक्यामध्ये मतदारांनी क्रॉस वोटिंग केल्याने जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत, तर दौंड पंचायत समितीवर भाजपने झेंडा फडकवला आहे.
Rahul Kul
Rahul KulSarkarnama
Published on
Updated on

Rahul Kul Daund Politics: दौंड तालुक्यामध्ये मतदारांनी क्रॉस वोटिंग केल्याने जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत, तर दौंड पंचायत समितीवर भाजपने झेंडा फडकवला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तालुक्यातील सातपैकी जागा जिंकत राष्ट्रवादीने दणदणीत यश मिळवले आहे, तर पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपने १४ पैकी आठ जागा जिंकत दहा वर्षांनंतर सत्ता मिळवली आहे.

Rahul Kul
Krishna Sugar Factory: पश्चिम महाराष्ट्रात आता सर्वात मोठ्या ‘कृष्णा’ कारखान्याचा धुरळा! भोसलेंविरोधात चव्हाण, मोहिते, कदम, पाटील, उंडाळकर येणार एकत्र?

या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेसाठी दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार व पंचायत समितीसाठी आमदार राहुल कुल यांना कौल देण्याचा संमिश्र ट्रेड या निवडणुकीच्या निमित्ताने पाहावयास मिळाला. तसेच, गेल्या २५ वर्षांपासून तालुक्यातील सर्व सत्ताकेंद्रे आमदार राहुल कुल किंवा रमेश थोरात यापैकी एकाच गटाकडे न देण्याची परंपरा मतदारांनी या निवडणुकीच्या निमित्ताने जोपासली.

Rahul Kul
Sangli News: सांगलीत चंद्रकांतदादा वर्षभर प्रचंड धावले, नेत्यांची फौज भाजपमध्ये आणली... पण शांत जयंत पाटील पुरून उरले!

जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्या अपघाती निधनाने मतदारांची सहानुभूती मिळाली. या निवडणुकीत मतदारांची सुप्त लाट राष्ट्रवादीच्या बाजूने होती. तालुक्यातील ठरावीक गावे वगळता सर्व गावांमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी मताधिक्य घेतले. तरुण व उच्चशिक्षित उमेदवारांना दिलेले प्राधान्य, राजकीय घराण्यांतील वारसदारांना उमेदवारी यामुळे राष्ट्रवादीने दणदणीत यश मिळवले.

Rahul Kul
Top 10 News: भाजपने फिनिक्स भरारी घेत उलथवली काँग्रेसची 20 वर्षांची सत्ता ते पुणे ZP च्या अध्यक्षपदासाठी 5 निकष

वीरधवल जगदाळे, तुषार थोरात, डॉ. गायत्री खळदकर, अनुराधा शितोळे साहेबराव पोळ यांचा विजय राष्ट्रवादीला सुखावणारा आहे. गेली ३५ वर्षे कुल परिवाराचा बालेकिल्ला असणारा राहू-खामगाव गटातील सागर शेलार यांचा विजय लक्षवेधी आहे. या विजयाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शेलार यांचे अभिनंदन केले. भाजपने यवत बोरीभडक गटाची अविनाश कुदळे यांच्या रूपातून जागा जिंकत एकमेव यश संपादन केले.

Rahul Kul
Thackeray Vs Koshyari: कोश्यारी पुन्हा बोललेच! माजी राज्यपालांचा राज ठाकरेंवर थेट हल्ला; म्हणाले, “मोदींना जरा जास्तच घाबरलेत”

उमेदवारीचे संकेत दिल्याचा फायदा

अजित पवार व जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात यांनी तालुक्यात सागर शेलार, तुषार थोरात, डॉ. गायत्री खळदकर व वीरधवल जगदाळे यांना उमेदवारी देणार असल्याचे खासगीत सांगितले होते. त्यामुळे या उमेदवारांनी महिन्यापूर्वीच सुरू केलेल्या प्रचार व जनसंपर्काचा फायदा निवडणुकीत मिळाला.

Rahul Kul
मुंबईची नवी ओळख : भारतातील पहिला ‘सिंगिंग रोड’ सुरू

पंचायत समितीत भाजपचाच सभापती

पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपने १४ पैकी ८ जागा जिंकल्या आहेत. सभापतिपद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. भाजपने तालुक्यातील सर्वच्या सर्व यवत, खामगाव व राहू या गणातील ओबीसी प्रवर्गाच्या जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडे सध्यातरी सभापतिपदासाठी उमेदवार नाही यावर शिक्कामोर्तब झाले आहे. जिल्हा परिषदेच्या तुलनेत पंचायत समितीमध्ये मतदारांनी भाजपला मतदान करणे पसंत गेले. राष्ट्रवादीचे शिवाजी ढमाले, धनंजय शेळके, प्रदीप दिवेकर, तर भाजपचे सुखदेव चोरमले, शुभांगी शिंदे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com