

Satyaki Savarkar News : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘बिलाँगिग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक लिखाण असल्याचा आरोप करत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी यांनी गांधी यांना नोटीस पाठविली आहे.
या नोटिशीला १५ दिवसांत सोनिया गांधी यांनी उत्तर न दिल्यास न्यायालयात मानहानीची याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा सावरकर यांनी दिला आहे.
सात्यकी यांनी सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील १० जनपथ या निवासस्थानी टपालाद्वारे नोटीस पाठविली आहे, तसेच त्यांना ईमेलद्वारे नोटीस बजाविण्यात आली आहे, अशी माहिती सावरकर यांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनी दिली.
‘सोनिया गांधी यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. या पुस्तकातील पान क्रमांक २०१ आणि ४४३ वर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक लिखाण केल्याचे निदर्शनास आले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी 'बिलॉन्गिंग अ जर्नी ऑफ लव्ह' या पुस्तकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत करण्यात आलेल्या उल्लेखांवरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला यापूर्वीच दिला होता. त्यानुसार त्यांनी नोटीस पाठवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.