Ahmednagar News: पारनेर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाने 15 पैकी 15 जागांवर मोठा विजय मिळवला आहे. तर या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.महाविकास आघाडीच्या 15 पैकी 15 उमेदवारांचा दारुण पराभव झाला. रविवारी दुपारी पारनेर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली.
पारनेर खरेदी विक्री संघाच्या निवडणुका याआधी बिनविरोधात झाल्या होत्या. पण यावर्षी ही निवडणूक पहिल्यांदा भाजप-शिंदे गट आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूने प्रतिष्ठेची बनली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी स्वत:लक्ष घातले होते. पण तरीही महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.
काही दिवसांपूर्वी झालेल्या पारनेर बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपने पारनेर खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप खासदार सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला मोठं आव्हान दिलं होतं. भाजपने पारनेर खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत मोठी ताकद लावली.
तर दुसरीकडे आमदार नीलेश लंके, माजी आमदार विजय औटी यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देखी या निवडणुकीत लक्ष घातलं होतं. मात्र, पारनेर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाने 15 पैकी 15 जागांवर मोठा विजय मिळवला. या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत फटाके फोडत मोठा जल्लोष साजरा केला.
Edited By-Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.