मुख्यमंत्री ठाकरेंच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई; शरद पवार म्हणाले...

सक्त वसुली संचालनालयाने (ED) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मेहुण्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.
Uddhav Thackeray, Sharad Pawar
Uddhav Thackeray, Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawarमुंबई : सक्त वसुली संचालनालयाने (ED) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मेहुण्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. ठाकरेंचे मेहुणे श्रीधर माधव पाटणकर (Sridhar Patankar) यांची 6. 45 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे. पुष्पक बुलियन प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केले.

Uddhav Thackeray, Sharad Pawar
एकरकमी एफआरपीसाठी ऊसाची मोळी खांद्यावर घेऊन सदाभाऊ, पडळकरांचे आंदोलन

शरद पवार यांनी आज (ता.२२) सोमेश्वर येथील साखर कारखान्याला भेट दिली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, ठाकरेंच्या मेहुण्यांवरील कारवाईबद्दल माहिती नाही. या सगळ्या साधनांचा गैरवापर हा या देशासमोरील महत्वाचा प्रश्न आहे, असेही पवार म्हणाले. केंद्र सरकारने लोकसभेत ईडीने सात वर्षात केलेल्या कारवायांची माहिती दिली. त्यावर पवार म्हणाले, तुम्ही दिलेली आकडेवारी खरी असेल तर ती स्वच्छ सांगते याच्यामध्ये फक्त राजकीय किंवा अन्य हेतूने कुणाला तरी त्रास देण्यासाठी हा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. स्पष्ट सांगायचे म्हणजे ५-१० वर्षांपूर्वी ईडी नावाची संस्था कुणाला माहिती नव्हती. आता ही ईडी गावागावात गेली. दुर्दैवाने या सगळ्या गोष्टींचा गैरवापर सध्या चालू आहे. बघुयात आता याला काही पर्याय आहेत. मात्र, त्यावर आता चर्चा न केलेली बरी, असेही पवार म्हणाले.

दरम्यान, ईडीने करचुकवेगिरी प्रकरणी पुष्पक बुलियन आणि समूहातील इतर कंपन्यांच्या विरोधात 6 मार्च 2017 रोजी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी ईडीने आधी महेश पाटील, चंद्रकांत पटेल आणि त्यांचे कुटुंबीय व त्यांच्या मालकीच्या कंपन्यांची 21.46 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. पुष्पक ग्रुपमधील पैसे महेश पटेल यांनी पुष्पक रिअॅलिटीचे नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या सहाय्याने इतर कंपन्यांत वळवल्याचे ईडीच्या तपासात समोर आले होते.

Uddhav Thackeray, Sharad Pawar
राजकारण तापलं! मुख्यमंत्री ठाकरेंच्या मेहुण्यालाच 'ईडी'चा दणका

सोमय्यांनी आधीही केले होते आरोप

कर्जत येथील वैजनाथ देवस्थान येथील जमिनीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी आधी केला होता. ''वैजनाथ येथील शंकराचे देवस्थान प्रसिद्ध आहे. अशा या देवस्थानची जमीन गैरव्यवहार करून एका सलीम नावाच्या व्यक्तीच्या नावावर केली. त्यानंतर ती जमीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या नावावर करण्यात आली, असे गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com