Pune Municipal Corporation : शिवसेना खासदार आणि भाजप आमदारात वाद...! काँग्रेसने केला 'हा' आरोप...

Shivsena Vs BJP : सदाशिव लोखंडे आणि सुनील कांबळे आमने - सामने; शहराध्यक्ष अरविंद शिंदेंनी केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार.
Sadashiv Lokhande, Arvind Shinde, Sunil Kamble
Sadashiv Lokhande, Arvind Shinde, Sunil KambleSarkarnama
Published on
Updated on

Pune Municipal Corporation : शिवसेना खासदार आणि भाजप आमदार यांच्यातील वादामध्ये पालिकेची सॅनिटरी नॅपकिनची टेंडर प्रक्रिया अडकली असून यामुळे तब्बल 38 हजार विद्यार्थिनींना समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना पालिकेच्यावतीने मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्यात येतात. (Pune Municipal Corporation Tender Process of Sanitary Napkin )

इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या तब्बल 38 हजार विद्यार्थिनींना याचा लाभ मिळत होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून पालिकेत प्रशासक असल्यामुळे मुलींना सॅनिटरी नॅपकिन मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. शिवसेनेचे खासदार आणि भाजप आमदार यांच्यामध्ये टक्केवारीवरून वाद सुरू आहे. टेंडर कोणाला द्यायचं यावरून खासदार आणि आमदार आमने - सामने आले आहेत.

Sadashiv Lokhande, Arvind Shinde, Sunil Kamble
Manoj Jarange: मनोज जरांगेंचे भुजबळांना प्रत्युत्तर; मला आव्हान देऊ नका, अन्यथा...

आपण शिफारस केलेल्या ठेकेदारालाच हे काम मिळावे, यासाठी हे दोघेही आग्रही आहेत. याचा फटका या टेंडर प्रक्रियेला बसला आहे. टेंडर देण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भाजप नेत्यांचा दबाव असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे आणि पुण्यातील कॅन्टोन्मेंटचे भाजप आमदार सुनील कांबळे यांचा टेंडरवरून वाद सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रक्रियेतून पैशांचा घोटाळा होत असल्याचादेखील आरोप काँग्रेसने केला आहे. या वादामुळे महापालिकेने ही टेंडर प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त कुणाच्या दाबावाखाली काम करीत आहेत का ? असा सवाल काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी उपस्थित केला आहे. तसेच आयुक्त दबावाखाली काम करीत असतील तर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, असेही काँग्रेसने नमूद केले आहे.

या प्रकरणाची आता काँग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा तिढा लवकर सुटला नाही तर आयुक्तांच्या दालनात बसून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अरविंद शिंदे यांनी दिला आहे.

(Edited by Amol Sutar)

R...

Sadashiv Lokhande, Arvind Shinde, Sunil Kamble
Jharkhand News : मुख्यमंत्रिपदावरून जावा-जावांमध्ये भांडण; सोरेन कुटुंबात फूट?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com