Shirur: शिरूर बाजार समितीत आजी - माजी आमदार भिडणार; १८ जागांसाठी २१४ जणांची माघार तर ५२ जण निवडणुकीच्या रिंगणात

Shirur APMC Election, Mahayuti Panel, Sharad Pawar Group: शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत २१४ उमेदवारांनी माघार घेतली. आता १८ जागांसाठी ५२ उमेदवार रिंगणात असून महायुती आणि शरद पवार गटामध्ये थेट राजकीय लढत रंगणार आहे.
Ashok Pawar-Dnyneshwar Katke
Ashok Pawar-Dnyneshwar KatkeSarkarnama
Published on
Updated on

Shirur APMC Election: शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी तब्बल २१४ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता १८ जागांसाठी ५२ उमेदवार अधिकृतपणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी हरिश्चंद्र कांबळे यांनी ही अधिकृत माहिती दिली आहे.

अर्ज छाननीनंतर २६६ अर्ज वैध ठरले होते, मात्र अंतिम दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला आणि मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्या महायुतीने एकत्र येत अधिकृत पॅनल जाहीर केले आहे. महायुतीच्या पॅनल घोषणेवेळी आमदार माऊली कटके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बापू शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Ashok Pawar-Dnyneshwar Katke
Maharashtra News Live Update: अमित शाहांसोबतच्या बैठकीनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,10 लाख टन कांदा...

महायुतीच्या पॅनलमध्ये सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून प्रमोद पन्हाळ, संतोष शिंदे, शशिकांत दसगुडे, स्वप्निल गायकवाड, विजय ढमढेरे, राहुल गव्हाणे व बापूसाहेब शिंदे यांचा समावेश आहे. तर ओबीसी गटातून राजेश लांडे, विमुक्त जाती-भटक्या जमाती गटातून सुहास मलगुंडे, आणि महिला राखीव गटातून प्रतिभा नागवडे व सुजाता नरवडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ग्रामपंचायत मतदारसंघाचा विचार करता, सर्वसाधारण गटातून सागर दरेकर व संतोष मोरे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गटातून संभाजी करडिले, आणि अनुसूचित जाती-जमाती गटातून वैष्णव इसवे यांना महायुतीने मैदानात उतरवले आहे.

विरोधकांकडुन मातब्बर रिंगणात

महायुतीला तगडे आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. माजी आमदार अशोक पवार यांनी पक्षाच्या वतीने माघारीच्या दुसऱ्याच दिवशी पॅनल स्थापन करत आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. यामुळे ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट आणि अटीतटीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

शरदचंद्र पवार गटाकडून सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघातून संतोष बाळासाहेब भोसले, विश्वास रामकृष्ण ढमढेरे, राजेंद्र रंगनाथ गायकवाड, संभाजी शिवाजी फराटे, उत्तम माणिकराव शेलार, ज्ञानेश्वर बबनराव थेरकर आणि शिवाजी सुखदेव वडुले हे निवडणूक लढत आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदारसंघासाठी नामदेव महादेव जाधव, तर ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघासाठी बाळासाहेब दादाभाऊ जाधव हे रिंगणात आहेत.

ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून नानासाहेब अनंथा साबळे, तर सहकारी संस्था विमुक्त जाती-भटक्या जमाती मतदारसंघातून सतीश भाऊजी कोळपे निवडणूक लढवत आहेत. याशिवाय सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीय गटातून विकास काशिनाथ शिवले, आणि महिला राखीव मतदारसंघातून शशिकला नानाभाऊ फुलसुंदर व राजश्री रवींद्र फराटे हे शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार असून इतर काही उमेदवार वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत.

Ashok Pawar-Dnyneshwar Katke
Nashik MLC Election : ठाकरेंच्या शिवसेनेची विधान परिषद निवडणुकीतून माघार, नाशिकच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट

मतदारांची आकडेवारी

या निवडणुकीत सेवा सहकारी संस्था मतदारसंघाच्या ११ जागांसाठी १ हजार ५८९ मतदार, ग्रामपंचायत मतदारसंघाच्या ४ जागांसाठी २०६ मतदार, व्यापारी-आडते मतदारसंघाच्या २ जागांसाठी ४६४ मतदार आणि हमाल-मापाडी मतदारसंघाच्या १ जागेसाठी १३७ मतदार मतदान करणार आहेत.

एकूण २ हजार ३९६ मतदार या १८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरवणार असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. त्यातच अनेक अपक्षांनीही मैदानात उडी घेतल्याने अपक्षांची मोठी मांदियाळी जमा होण्याची शक्यता वर्तवली जात असून या बंडखोरीचा फटका नेमका कोणाला बसणार, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com