Pune Metro Update : आयटीयन्सची होणार कोंडीतून सुटका! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो 'या' महिन्यापासून धावणार!

Shivajinagar–Hinjewadi Metro : शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे काम हे अंतिम टप्प्यात असून लवकरच ही मेट्रो धावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिकीट व्यवस्थापनाची जबाबदारी एका फ्रेंच कंपनीकडे देण्यात आली आहे.
Shivajinagar–Hinjewadi Metro
Shivajinagar–Hinjewadi MetroSarkarnama
Published on
Updated on

Pune Metro News : हिंजवडीत जाताना आयटीयन्ससह हजारो वाहनचालकांना ट्रॅफिकचा सामाना करावा लागतो. मात्र, यातून लवकरच पुणेकरांची सुटका होणार आहे. कारण शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो लाईन्स काम 87 टक्के झाले असून ट्रायल रन देखील यशस्वी झाली आहे. त्यामुळे मार्च 2026 पर्यंत या मार्गावर मेट्रो धावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोमार्गावर 23 स्थानके असणार आहेत. आणि मेट्रोमध्ये सर्व लोको पायलट महिला असणार आहे. या मेट्रो मार्गिकेचे व्यवस्थापनाची जबाबदारी फ्रेंच कंपनीला देण्यात आली आहे. पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडसोबत फ्रेंच कंपनी केओलिसने करार केला आहे त्यामुळे 23 स्थानकांच्या तिकीट व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांची असणार आहे.

या मार्गिकेसाठी तब्बल आठ हजार 313 रुपये खर्च आला असून काम अंतिम टप्प्यात आहे. मार्गिकेवर ट्रायल रन यशस्वी पूर्ण केल्यानंतर आता जड बांधकामाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या मार्गिकेमुळे शिवाजीनगर ते हिंजवडी हे अंतर अवघ्या 35 ते 40 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.

Shivajinagar–Hinjewadi Metro
MSRTC Recruitment 2025 : ST मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी! तब्बल 'इतक्या' हजार जागांसाठी मेगाभरती

दरम्यान, या मार्गीकेवर मेगापोलिस सर्कल,एम्बेसी क्वाड्रॉन बिझनेस पार्क, डोहलर, इन्फोसिस फेज २,विप्रो फेज २,पाल इंडिया, शिवाजी चौक, हिंजवडी, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम एनआयसीएमएआर, रामनगर, लक्ष्मीनगर, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर, कृषी अनुसंधान केंद्र, सकाळनगर, विद्यापीठ, आरबीआय, कृषी महाविद्यालय शिवाजीनगर, दिवाणी न्यायालय हे स्टाॅप असणार आहेत.

Shivajinagar–Hinjewadi Metro
Loan Waiver Farmers : 'त्या' शेतकऱ्यांना द्यावी लागणार कर्जमाफी, हायकोर्टाचा सरकारला दणका!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com