Shivsena News: महापालिका गमावली, आता 'मोठा भाऊ' भाजपला झटका देण्यासाठी 'धाकट्या' शिंदेंची झाली एन्ट्री; पुण्यात टाकणार नवा डाव

Pune Shivsena Politcs: आगामी तीन वर्षांमध्ये कोणत्याही निवडणुका नसल्याने या काळात पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.
Shivsena-BJP
Shivsena-BJPSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी तीन वर्षांमध्ये कोणत्याही निवडणुका नसल्याने या काळात पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. या दृष्टीकोनातून खासदार श्रीकांत शिंदे हे राज्यातील विविध भागांचा दौरा करत असून नव्याने संपर्क प्रमुखांच्या नेमणुका देखील करण्यात येत आहेत.

अशीच एक बैठक श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये झाली. या बैठकीला पुण्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांसह पुण्याचे संपर्क प्रमुख आणि उद्योग मंत्री उदय सामंत, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार शरद सोनवणे हे उपस्थित होते.

श्रीकांत शिंदे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत पक्षाला उत्कृष्ट यश मिळाल्यानंतर, नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पक्षाच्या वतीने निवडून आले. मात्र, महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी अपेक्षित यश मिळाले नाही. या ठिकाणी पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या सूचना पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

यासाठी राज्यभरातील शिवसेनेची नव्या संपर्कप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे संपर्कप्रमुख आपापल्या क्षेत्रात आढावा बैठका घेत असून, पक्षांतर्गत मतभेद कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं श्रीकांत यांनी शिंदे यांनी स्पष्ट केलं.

Shivsena-BJP
Nashik MHADA Scam : नाशिक म्हाडा फसवणूक प्रकरणाचा होणार पर्दाफाश : आयुक्त गेडाम-कर्णिकांची एण्ट्री, चौकशीसाठी 6 सदस्यीय समिती गठीत

पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमुळे पुणे महापालिकेमध्ये पराभव स्वीकारावा लागला. मात्र, या पराभवानंतर देखील कुठल्याही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला नाही. त्या उलट खालील पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता आम्ही काम कसं करायचं अशी विचारणार हे पदाधिकारी करताना पाहायला मिळत आहे.

त्यामुळे पुढील तीन वर्षांमध्ये भाजपला तोडीस तोड देणारी संघटक रचना करण्याचा शिवसेनेचा मानस हा अंतर्गत गटबाजीमुळे कितपत यशस्वी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com