Shripad Dhekane : मुख्यमंत्री कार्यालयातील OSD श्रीपाद ढेकणे यांचे निधन

Shripad Dhekane Passes Away : मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष अधिकारी डॉ. श्रीपाद ढेकणे यांचे अल्पशा आजाराने झाले निधन झाले.
Shripad Dhekane Passes Away
Shripad Dhekane Passes Awaysarkarnama
Published on
Updated on

Pune News : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी पूर्णवेळ कार्यकर्ते, मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष अधिकारी डॉ. श्रीपाद ढेकणे (वय 62) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. विद्यार्थी चळवळ, अध्यापन आणि राज्याच्या शिक्षण धोरण प्रक्रियेत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे

अध्यापन क्षेत्रातील कार्यासोबतच त्यांनी 'महापालिकांच्या अंदाजपत्रकांचा तौलनिक अभ्यास' या विषयावर पीएच.डी. पूर्ण केली होती

1983 मध्ये त्यांनी विद्यार्थी परिषदेच्या कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर पुणे ग्रामीण, सोलापूर, शिवाजी विद्यापीठ, कोकण आणि गोवा भागात संघटनमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. खडकी येथील टी. जे. महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. येथील कार्यरत असताना त्यांनी त्यांची पीएचडी पूर्ण केली

विनोद तावडे हे राज्यसरकारमध्ये शिक्षणमंत्री असताना ढेकणे यांनी शिक्षण मंत्रालयात विशेष अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातही त्यांनी विशेष अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली.

Shripad Dhekane Passes Away
Nanded Guardian Minister: नांदेडच्या पालकमंत्री पदावरून अतुल सावेंना हटवा, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मंत्री संजय राठोडांकडे मागणी

विनोद तावडेंनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत म्हटले की, श्रीपाद ढेकणे हा विद्यार्थी परिषदेतील माझा पुण्यापासूनचा सहकारी. विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून, नंतर विद्यार्थी परिषदेत पूर्ण वेळ आणि मंत्रिपदाच्या काळात माझ्या कार्यालयात पाच वर्षे त्याने माझ्यासोबत काम केले. तो कॅन्सरने आजारी आहे, व प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे, हे समजल्यावर त्याला जाऊन भेटावं, बोलावं असं मनात आलं आणि तातडीने आज त्याची पुण्यात मंगेशकर रुग्णालयात भेट घेतली. तिथून परतताना दिल्लीला जाण्यासाठी विमानात बसेपर्यंत श्रीपाद गेला अशी बातमी आली. खऱ्या अर्थाने श्रीपाद बरोबर काम करत असताना आपल्या विचारांशी व कार्यपद्धतीशी पूर्णपणे समर्पित, विचारांशी कधीच तडजोड न करणारा, कामामध्ये काटेकोरपणा असणारा, मी मंत्री असताना आपण याचे जुने मित्र आहोत असे भासू न देता मंत्री म्हणून आदर ठेवणारा आणि व्यक्तिगत भेटीगाठीत मात्र मोकळेपणाने बोलणारा हा जिवाभावाचा सहकारी मित्र आज गेला याचे दुःख शब्दांपलिकडचे आहे. भावपूर्ण श्रद्धांजली श्रीपाद.

Shripad Dhekane Passes Away
Mohan Bhagwat : 'भारतात एकही मुस्लीम नको' म्हणणारा हिंदूच नाही...; मोहन भागवतांचं न्यूयॉर्कमधील वक्तव्य चर्चेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com