Mohan Bhagwat News, 30 Aug : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे आयोजित ‘वन वर्ल्ड, वन ह्युमॅनिटी’ या धर्मगुरूंच्या परिषदेला संबोधित केले. यावेळी हिंदू राष्ट्राची संकल्पना आणि मुस्लिम समाजाच्या स्थानाबाबत बोलताना त्यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले.
“जर एखाद्या हिंदूला वाटत असेल की, भारतात एकही मुस्लीम नको, तर तो स्वतः हिंदू नसेल,” असे मोहन भागवत म्हणाले. आपल्या भाषणात मोहन भागवत यांनी २०१८ मधील एका कार्यक्रमाची आठवण सांगितली. या कार्यक्रमात मुस्लिम समाजातील काही सदस्य उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी भागवत यांना हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेबाबत प्रश्न विचारला होता.
“तुम्ही हिंदू संघटना आहात आणि हिंदू राष्ट्राबद्दल बोलता. मग आमचं काय होणार? तुम्ही आम्हाला बाहेर काढणार का?” असा प्रश्न मुस्लिम बांधवांनी विचारल्याचे भागवत यांनी सांगितले. त्यावर आपण “नाही, ते हिंदुत्व नाही,” असे उत्तर दिल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, एखाद्या हिंदूला भारतात मुस्लिम असूच नयेत असे वाटत असेल, तर तो हिंदू विचार मानणारा व्यक्तीच नाही. हिंदू विचारसरणीमध्ये विविध मार्गांचा स्वीकार असल्याचे भागवत यांनी सांगितले. “जर तुम्ही हिंदू असाल, तर तुमचा विश्वास असला पाहिजे की सर्व मार्ग एकाच ध्येयाकडे जातात आणि प्रत्येक माणसाला प्रतिष्ठा आहे.
तुमच्यात आणि त्यांच्यात कोणताही भेद नाही. सत्य एकच आहे आणि मानवता ही त्याच सत्याची उपज आहे. मात्र सत्य वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले आणि समजून घेतले जाते," असे भागवत म्हणाले. माणसांमध्ये वरवर अनेक भेद दिसत असले तरी मूलभूत पातळीवर मानवता एकच आहे, असा विचार त्यांनी मांडला.
ते म्हणाले, “संपूर्ण मानवजात एक आहे. आपल्यात वरवर दिसणारी विविधता असली तरी आपण एक आहोत. विविधता ही आपल्या एकतेचे प्रतीक आहे. तिचा स्वीकार, आदर आणि जतन केले पाहिजे.” भारताच्या धार्मिक परंपरेचा उल्लेख करताना भागवत यांनी सांगितले की, भारताने इतिहासात अनेक धर्म आणि पंथांच्या लोकांना आश्रय दिला आहे. परकीय आक्रमणांमुळे देशाने अनेक गोष्टी गमावल्या, मात्र भारताची परंपरा कायम राहिली. हीच परंपरा ‘एक जग, एक मानवता’ हा संदेश देते, असे मोहन भागवत यांनी न्यूयॉर्कमधील परिषदेत सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.