पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे (Pimpri-Chinchwad) माजी पोलिस (Police) आयुक्त कृष्णप्रकाश (Krishnaprakash) यांची मुदतपूर्व बदलीची चौकशी व्हावी, अन्यथा न्यायालयात दाद मागू. तसेच त्यांच्याबाबत व्हायरल झालेल्या पत्रातून त्यांची बदनामी झाली. या पत्राचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी शहरातील विविध संस्था संघटनांनी पत्रकार परिषदेत केली.
या वेळी कष्टकरी जनता आघाडीचे अध्यक्ष बाबा कांबळे, नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव, माजी नगरसेवक धनराज बिर्दा, अंकुश कानडी, रिपाईचे वाहतूक आघाडी अध्यक्ष अजीज शेख, बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गंध, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे, शिवशाही युवा संघटनेचे शिवशंकर उबाळे, छावा संघटनेचे अध्यक्ष धनाजी येळेकर आदी उपस्थित होते.
कृष्णप्रकाश यांच्यावर राजकीय फायद्यासाठी दबाव होता का? त्यांच्याकडून काही चुकीचे कामे करून घेण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांनी केला होता का, असे प्रश्न बाबा कांबळे यांनी उपस्थित केले. चुकीचे कामे करण्यास नकार दिल्यानेच त्यांची बदली केल्याचा दावाही त्यांनी केला. व्हायरल पत्राची चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेला कळायला हवी. या बद्दल मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी करणार, असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच चौकशी न झाल्यास न्यायालयात दाद मागणार, असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
मानव कांबळे म्हणाले, कृष्णप्रकाश यांनी लोकाभिमुख प्रक्रिया राबविली होती. सर्वसामान्य लोकांना न्यायप्रक्रियेत त्यांनी संधी दिली. सध्या त्यांच्यावर वैयक्तिक हेवेदावे करून अर्ज केले जातात, असा आरोप त्यांनी केला. राहुल डंबाळे म्हणाले, गृहमंत्र्यांनी याप्रकरणी निवेदन करुन खरी वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी आणि दबावातून केलेली बदली रद्द करावी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.