चक्क पालकमंत्र्यांच्या गाडीतून विद्यार्थ्यांचा प्रवास

सोबत प्रवास करीत असताना पालकमंत्री ठाकूर यांनी विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या.
यशोमती ठाकूर

यशोमती ठाकूर

सरकारनामा

Published on
Updated on

तिवसा : एसटी बस कर्मचाऱ्यांचा संप असल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांना शाळेत पायीच प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, आज सकाळी पालकमंत्री यशोमती ठाकूर अमरावतीहून तिवशाकडे जात असताना शाळेत पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या गाडीत बसवून त्यांना शाळेपर्यंत सोडले. त्यांच्याशी गप्पा मारत मनोबल वाढविले.चांगला अभ्यास करा, मोठे व्हा,असा आशीर्वाददेखील दिला.मंत्र्यांसोबतच्या या प्रवासामुळे विद्यार्थी अचंबित झाले.

<div class="paragraphs"><p>यशोमती ठाकूर</p></div>
आमदार सातपुतेंची तोफ आता गोव्यात धडाडणार !

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप मिटलेला नाही.त्यामुळे एसटीची वाहतूक सुरळित झालेली नाही. याचा फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसत आहे. जिथे बस सुरू आहेत. त्या ठिकाणी बसेस शाळकरी विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचवत नाहीत अशी स्थिती आहे. दरम्यान,आज सकाळी पालकमंत्री यशोमती ठाकूर अमरावती-नागपूर मार्गावरून तिवशाकडे जात असताना त्यांना काही विद्यार्थी रस्त्यावर थांबलेले दिसले. मंत्री ठाकूर यांनी विद्यार्थ्यांची विचारपूस करीत चक्क आपल्या गाडीमध्ये त्यांना बसवून फत्तेपूर येथे त्यांना पोहोचवून दिले.

<div class="paragraphs"><p>यशोमती ठाकूर</p></div>
पुणे भाजपचे रणशिंग फुंकण्यासाठी अमित शहांचा दौरा ठरला..

सोबत प्रवास करीत असताना पालकमंत्री ठाकूर यांनी विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या.त्यांचे मनोबलदेखील वाढविले.त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधून त्यांना चॉकलेटदेखील दिले.चांगला अभ्यास करा, मोठे व्हा असा आशीर्वाद देखील त्यांनी दिला.अचानक घडलेल्या अशा पद्धतीच्या प्रवासाने विद्यार्थी अचंबित झाले होते. राज्याच्या महिला व बालविकास तसेच अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या वाहनातून त्यांच्यासोबत प्रवास करण्याची संधी आपल्याला मिळेल, हे त्यांनी कधी स्वप्नातदेखील पाहिले नव्हते.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com