Supriya Sule News : 'बहिणींनो, डरना मना है, राहिले फक्त 70 दिवस'; म्हणत सुप्रिया सुळेंनी फुंकले विधानसभेचे रणशिंग

Ncp Political News : हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्र्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने रणशिंग फुंकले आहे.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सर्वच पक्षाने तयारी सुरु केली आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्र्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने रणशिंग फुंकले आहे. यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळेंनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली.

काश्मीर ते कन्याकुमारी आपला भारत एक आहे. हे मतदारांनी लोकसभा निवडणुकीत दाखवून दिले आहे. हे सरकार कधीपर्यंत चालेल माहीत नाही, मात्र आम्ही सरकार अस्थिर करणार नाही. हे कॉपी करून आलेले सरकार आहे.

लोकसभा निवडणुकीत महिला कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना धमकावण्यात आले. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभेत कितीही धमकी येऊ द्या 'बहिणींनो, डरना मना आहे' आता येणाऱ्या विधानसभा निवडणूक ७० दिवस शिल्लक राहिलेत, घरोघरी आपल्याला पोहोचून महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आणायचे आहे, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. (Supriya Sule News)

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे व बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नागरिक सत्कार कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले होते.

यावेळी सुप्रिया सुळे (Supriya sule) म्हणाल्या, हे भाजपचे सरकार नसून महागाई, बेरोजगार, भ्रष्टाचाराचे सरकार असल्याचे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली. खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, 'हा देश तुमचा आमचा सर्वांचा आहे. जाती भेदाच्या भिंती तोडून देश एकसंघ कसा राहील हे पाहण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ज्या विश्वासाने मतदारांनी मला मतदान केले आहे. त्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही.

Supriya Sule
Vidhan Parishad Election News : विधान परिषद निवडणुकीत 'हे' छोटे पक्ष ठरणार 'किंगमेकर'; Cross Voting चा फटका कोणाला?

यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाच्या इच्छुकांची मोठी गर्दी दिसून आली. यावेळी विविध पदाधिकाऱ्यानी वाजत-गाजत कार्यकर्त्यांच्या गर्दी जमा करून मोठे शक्ती प्रदर्शन केले. आगामी विधानसभेच्या निवडणुकीनंतर लागलीच महापालिकेची निवडणूक होणार असल्याने इच्छुकांनी आपल्या नेत्यांपुढे शक्तिप्रदर्शन केले. यावेळी शैलेश बेल्हेकर, शादाब खान यांनी पक्षात प्रवेश झाला.

प्रशांत जगताप यांच्या उमेदवारीचे संकेत...

केंद्र व राज्य सरकारचे विरोधात तसेच महागाई बेरोजगारी अनेक मुद्द्यांवर प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात मोठ्या प्रमाणात आंदोलने होतात. या आंदोलनाची राज्यात चर्चा होते. सर्वसामान्यांचा आवाज उठवण्याचे काम प्रशांत जगताप करतात, लोकसभेला तुमची साथ राहिली, विधानसभेलाही साथ द्या, असे आवाहन करत प्रशांत जगताप यांना हडपसर विधानसभा उमेदवारीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी संकेत दिले.

Supriya Sule
Video Sharad Pawar News : ठाकरे गटाच्या इच्छुकांच्या शरद पवारांच्या भेटीसाठी रांगा; मोर्चेबांधणी सुरू

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com