Video Sharad Pawar News : ठाकरे गटाच्या इच्छुकांच्या शरद पवारांच्या भेटीसाठी रांगा; मोर्चेबांधणी सुरू

Shivsena Political News: लोकसभा निवडणुकीनंतर रोज किमान दोन तास भेटीगाठींसाठी काढावे लागत असल्याचे खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
Mahdev Babar, Sharad Pawar, Chandrkant mokate
Mahdev Babar, Sharad Pawar, Chandrkant mokate sarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्यानंतर विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्यामुळे विधानसभेला इच्छुक असणाऱ्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून भेटीगाठींच्या सत्र सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर रोज किमान दोन तास भेटीगाठींसाठी काढावे लागत असल्याचे खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

यामध्ये शरद पवार गटामध्ये प्रवेश करू इच्छिणारे व शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांची देखील संख्या लक्षणीय आहे. (Sharad Pawar News)

विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीतील इच्छुकांमध्ये चढाओढ सुरू आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून (MVA) कोणती जागा कोणत्या पक्षाला सुटेल, याबाबत अद्याप तरी स्पष्टता आलेली नाही.

त्यामुळे इच्छुक आपल्या पक्षाच्या वरिष्ठांसोबतच महाविकास आघाडीतील इतर पक्षातील वरिष्ठांसोबत चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे पुण्यातील ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले महादेव बाबर, पृथ्वीराज सुतार, चंद्रकांत मोकाटे यांच्यासारखे नेते शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीला येताना दिसत आहेत. दोन दिवसापूर्वी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले पृथ्वीराज सुतार यांनी शरद पवारांची भेट घेतली.

Mahdev Babar, Sharad Pawar, Chandrkant mokate
Vishwajeet Kadam : कोल्हापूरात खंडपीठच्या मागणीला छेद देणारा ठराव; डॉ. कदमांच्या डोक्यात वेगळचं फॅड

त्यानंतर शनिवारी ठाकरे गटाकडून कोथरूडमधील दुसरे इच्छुक असणारे चंद्रकांत मोकाटे आणि हडपसरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले गजानन बाबर यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

चंद्रकांत मोकटे (Chandrakant Mokate) म्हणाले, लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने चांगले काम केले. यामुळे पंधरा दिवसांपूर्वी शरद पवार यांनी सर्व स्थानिक नेत्यांना भेटण्यासाठी बोलावले होते. मात्र, काही कारणास्तव आम्ही त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही. त्यामुळे शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. मी कोथरूडमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. मात्र, याबाबतचा सर्वस्वी निर्णय हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील. त्यांच्याकडे निवडणूक लढण्याबाबतची इच्छा व्यक्त केली असल्याचे मोकटे म्हणाले.

Mahdev Babar, Sharad Pawar, Chandrkant mokate
Sambhajinagar Politics : संभाजीनगरात भाजपकडून 'डॅमेज कंट्रोल'; ठाकरेंकडे निघालेल्या नेत्याला रोखण्यासाठी भाजपकडून मनधरणी

महादेव बाबर म्हणाले, शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची भेट घेतली. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही जनतेच्या सेवेत असून निवडणुकीची देखील तयारी करत आहोत. हडपसर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये कोणाकडे राहील याबाबत अद्याप तरी निर्णय झालेला नाही. हा मतदारसंघ उद्धव ठाकरे हे आपल्याकडे ठेवतील, असा मला विश्वास असल्याचे बाबर यांनी सांगितले.

Mahdev Babar, Sharad Pawar, Chandrkant mokate
Shivsena UBT News : उद्धव ठाकरे संभाजीनगर दौऱ्यात भाजपला धक्का देणार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com